सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/दादा जाधव
फडतरवाडी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार.
मुख्य पाणीपुरवठा विहिरीवरील पाच ते सहा वर्षापासून सोलर बंद चालू करण्याची नागरिकांची मागणी
महाराष्ट्र शासनामार्फत गावातील मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर सोलर सिस्टिम बसवण्यात आली आहे. जेव्हा वीजपुरवठा बंद असेल तेव्हा नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ती बसवण्यात आली आहे, पण ती बसवल्यापासून एकदाही गावाला त्याचा फायदा झाला नाही. कारण ती सोलर सिस्टीम जोडलीच नाही.एकही दिवस त्या सोलरच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा झाला नाही.यातून फडतरवाडी ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार पाच ते सहा वर्षांपासून हे सोलर सिस्टिम बंद आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अत्यंत दुर्लक्ष असून हे सोलर सिस्टिम चालू करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.काही नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनास विचारणा केल्या असता ग्रामपंचायत प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सोलर सिस्टिम चालू करावी.

Post a Comment
0 Comments