सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
आता लढायचं, कुठला पक्ष ते नंतर बघू...!-श्रीमंत रामराजे
आमदारकीला पराभव तुमच्या गाफिलपणामुळेच..!आ. रामराजे यांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान, वेळ पडली तर तुमच्यासाठी आम्ही तुरुंगात जाऊ.
निरा-देवधर व धोम-बलकवडी ही दोन्ही धरणे रामराजे यांनी बांधली आणि हे लोक तेथे जातात स्वतःचा फोटो काढतात आणि स्वतःला पाणीदार म्हणून घेतात-श्रीमंत रघुनाथराजे
सध्या तालुक्यात खोट्या केसेस, दमदाटीचे राजकारण सुरू झाले आहे. सत्तेचा गैरवापर करून आम्ही कधीही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही, कारण ते आमचे संस्कार नाहीत; पण आता ही निवडणूक आमची राहिलेली नसून कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अस्तित्वाची आणि शांततेने जगण्याची लढाई बनली आहे. आज कार्यकर्ता म्हणून तुम्हाला त्रास होतोय, उद्या नागरिक म्हणून हा त्रास तुम्हाला भोगावा लागणार आहे.
आमदारकीला पराभव झालातो तुमच्या गाफिलपणामुळे,विरोधक तुमच्या गावात पैसे वाटत होते, तेव्हा तुम्ही विरोध का केला नाही. तेव्हा तुम्ही काय बायकोबरोबर टीव्ही बघत होता का? आता यापुढे कोणता पक्ष हे विचारून वेळ घालवू नका.आपला राजकारणात पहिलाच अपक्ष असा जन्म झाला असून पक्ष सोडा गट म्हणून पुन्हा एकदा कामाला लागा, विरोधक सत्तेचा दुरुपयोग करून प्रवेश करून घेत आहेत. कोणाची बिले काढण्यासाठी अडवणूक,पोलिसांमार्फत धमक्या देत त्यांना गटात, पक्षात घेतले पण जे गेले ते मेले... या पुढे त्यांचा विचार सोडा.
आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला यापुढे वाद घालणारा कार्यकर्ता पोलिसांना न घाबरणारा, कार्यकर्ता अपेक्षित असून तुमच्यासाठी वेळ पडली तर आम्ही तुरुंगात जाऊ पण तुम्ही आता कोणालाही घाबरू नका लढाई करा, अन प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी तयार राहा असे आवाहन श्रीमंत रामराजे यांनी केले यावेळी माजी आमदार दीपकराव चव्हाण, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, सुभद्राराजे नाईकनिंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे,पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्माताई भोसले राजेगटाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments