सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तीन इसमांना जेरबंद.
(स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची दमदार कारवाई)
विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या तीन इसमांना जेरबंद करत त्यांचेकडुन बेकायदेशिर देशी बनावटीच्या पिस्टल,
जिवंत काडतुसे, मोबाईल हॅन्डसेट व कार असा एकुण 8,51,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी
अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व सध्या चालु असलेल्या दिवाळी सणाचे अनुशंगाने विशेष मोहिम
राबवुन विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना अरुण
देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक
स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांनी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांचे अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन
कारवाई करण्याचे सुचना दिलेल्या आहेत.
अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे सुचने प्रमाणे व पोलीस उपनिरीक्षक परितोष
दातीर यांचे पथक दिनांक 19/10/2025 रोजी कराड शहर, कराड तालुका व मसुर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध
पेट्रोलींग करीत होते. दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारचे मार्फत बातमी मिळाली
की, संशयीत इसम त्यांचेकडील ब्रीझा कार क्रमांक एमएच-50- एल-4289 मधुन अवैध अग्नीशस्त्रांची वाहतुक करणार
आहेत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी पोलीस उप-निरीक्षक परितोष दातीर यांचे पथकास मिळाले बातमीची माहिती
देवुन मिळाले बातमी प्रमाणे कारवाई करण्याकरीता मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पथकाने शामगाव
घाट ते कराड शहर जाणरे रोडवर करवडी येथे सापळा लावला. त्यानंतर थोड्याच वेळात मिळाले बातमीतील कार
पथकाचे दिशेने येत असताना दिसल्याने पथकतील पोलीस स्टाफने सदर कारला कार आडवी मारुन कार थांबवुन
कारमधील 03 इसमांना शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचेकडे कौशल्यपुर्ण विचारपूस करुन आरोपी
1. कार्तीक अनील चंदवानी वय- 19 वर्षे रा. लाहोटी नगर, मलकापुर, ता. कराड, जि. सातारा
2. ऋतेष धर्मेंद्र माने वय-22 वर्षे रा. कृष्णा अंगण, बंगलो नं. सी-3, वाखान रोड, कराड, ता.कराड
जि. सातारा,
3. अक्षय प्रकाश सहजराव वय-28 वर्षे रा. लाहोटी नगर, मलाकापुर, कराड, ता. कराड जि.सातारा,
03 देशी बनावटीच्या पिस्टल मॅग्झीनसह, 03 जिवंत काडतुसे, 02 मोबाईल हॅन्डसेट व ब्रीझा कार असा त्यांचेकडून
8,51,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन एकुण तालुका पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगले बाबत
गुरनं. 681/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3(1), 25 प्रमाणे गुन्हा नोंद करुन कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई मध्ये श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस
अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोउनि परितोष दातिर,
विश्वास शिंगाडे, कराड तालुका पोलीस स्टेशनकडील सपोनि संभाजी चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस
अंमलदार सफौ. अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, शरद बेबले, लेलैश फडतरे, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित
झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव,
स्वप्नील शिंदे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, सचिन ससाणे, रविराज
वर्णेकर चालक सफौ. शिवाजी गुरव कराड तालुका पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार संदीप कांबळे, मिलिंद
बैले, विकास शेडगे, योगेश गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे
पालीस अधीक्षक, सातारा, व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

Post a Comment
0 Comments