Type Here to Get Search Results !

साखरवाडी येथे भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/वैभव जगताप 

साखरवाडी येथे भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन. 


साखरवाडी ता.फलटण जि.सातारा येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, युवा नेते धनंजय (दादा) साळुंखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना प्रल्हादराव साळुंखे पाटील हे म्हणाले की आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तरडगाव जिल्हा परिषद गट व साखरवाडी जिल्हा परिषद गट या परिसरातील कार्यकर्त्यांची आवक जावक या ठिकाणी असते आणि साखरवाडीत आल्यानंतर कुठेतरी बैठकिचे हक्काचे ठिकाण असावे अशी कार्यकर्त्यांची अनेक दिवसां पासूनची इच्छा होती म्हणून मी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्हाला पाहिजे असे सुसज्ज ऑफिस चालू करा आणि आपण आज या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पाडत आहोत.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की साखरवाडी येथे लवकरच आनंदाचा  वर्षाव होणार आहे कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची दि.२६ तारखेला सकाळी १० वा.फलटण येथे सभा होणार असुन साखरवाडी येथील तहसील कार्यालय व स्वतंत्र पोलीस निरीक्षक ऑफिस याच्या ही काही तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत याची ही घोषणा होईल व फलटण तालुक्यातील अन्य झालेल्या काही कामांचा शुभारंभ होणार आहे अशी ग्वाही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

याप्रसंगी अमरसिंह नाईक निंबाळकर, माणिक (आप्पा) भोसले, जयकुमार शिंदे,डि.के.पवार, विक्रम भोसले,अमित रणवरे, बापुराव शिंदे, लक्ष्मण सोनवलकर, माणिकराव सोनवलकर, विश्वासराव भोसले, सुरेश (नाना) भोसले, बाळासाहेब कुचेकर, राजेंद्र पवार व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments