Type Here to Get Search Results !

जहांगीर आर्ट गॅलरी - मुंबई येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रकार श्री. चंद्रकांत फडतरे यांच्या चित्रांचे प्रदर्शन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/हरिदास सावंत (सर)

जहांगीर आर्ट गॅलरी - मुंबई येथे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रकार श्री. चंद्रकांत फडतरे यांच्या चित्रांचे प्रदर्शन.



साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातील १९७५ सालच्या बॅचचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रकार माननीय श्री चंद्रकांत तात्याबा फडतरे ( राहणार - फडतरवाडी , तालुका फलटण) यांच्या लक्षवेधक चित्रांचे भव्य प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत दिनांक २१ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.प्रामुख्याने ग्रामीण जीवनातील बारीक सारीक बारकावे अचूक हेरून त्यातून लक्षवेधक चित्रकृती निर्माण करण्यात श्री फडतरे सरांचा हातखंडा आहे.विविध चित्रांच्या माध्यमातून आपली समृद्ध संस्कृती जोपासून ती वाढवण्यात सरांना विशेष रुची आहे.भारताबरोबरच परदेशातही फडतरे सरांच्या चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.आजपर्यंत देश परदेशात  सुमारे ६० प्रदर्शने आयोजित करून सरांनी आपल्या कलेला जोपासले आहे. ठाणे मुंबई येथे वास्तव्य करत असलेल्या फडतरे सरांची ग्रामीण भागाची ओढ त्यांच्या कलेतून निश्चित जाणवते. फेब्रुवारी २०२४ मध्ये साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागात कै.रमेश बिडवे -( साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाचे माजी कलाशिक्षक आणि श्री फडतरे सरांचे मार्गदर्शक गुरू ) यांचे स्मरणार्थ श्री फडतरे सरांचे भव्य चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.साखरवाडी आणि परिसरातून हजारो कला प्रेमींनी याचा लाभ घेतला होता.आता मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत संपन्न होत असलेल्या या चित्र प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर - साखरवाडी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments