सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत (सर)
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय परसबाग तालुकास्तर स्पर्धेत साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाला द्वितीय क्रमांक.
शालेय पोषण आहार योजनेमध्ये शालेय स्तरावरच पोषण शक्ती निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय परसबाग स्पर्धेत साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग , साखरवाडी ( तालुका फलटण , जिल्हा सातारा ) या प्रशालेस तालुकास्तरावर द्वितीय क्रमांकाचे 8000 रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.विद्यालयाच्या परस बागेत बहुविध फळझाडे , फुल झाडे , फळ भाज्यांची रोपे , वेली इत्यादी अनेक प्रकारची सुयोग्य लागवड केली असून शालेय मुले मुली अगदी व्यवस्थित देखभाल करतात.उत्पन्न होणाऱ्या सगळ्या फळभाज्या शालेय पोषण आहार योजनेमध्ये वापरल्या जातात. साखरवाडी शिक्षण संस्थेच्या सचिव तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे व परसबाग विभाग प्रमुख श्री गोपाळ कांबळे सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय परसबाग उल्लेखनीय काम करत आहे.गतवर्षी सुद्धा प्रशालेस केंद्र स्तरावर प्रथम क्रमांकाचे 3000 रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते. विद्यालयाच्या या यशात विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी यांचा मोलाचा सहभाग आहे. साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील , संस्था अध्यक्ष माननीय श्री धनंजयदादा साळुंखे पाटील , संस्था संचालक सर्वस्वी श्री माणिकआप्पा भोसले , श्री राजेंद्र शेवाळे , श्री राजेंद्र भोसले तसेच साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर , विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि परिसरातील सर्व पालकांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment
0 Comments