Type Here to Get Search Results !

डॉ.संपदा मुंडे या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर हा पोलीसच नाही.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

डॉ.संपदा मुंडे या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर हा पोलीसच नाही.



फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे हिने दिनांक 23 रोजी फलटण येथील एका नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली असून आत्महत्या केलेल्या महीला पिडितीने आपल्या हातावरती ज्या दोन आरोपींची नावे लिहिलेली आहेत त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व पोलीस प्रशांत बनकर असे लिहिलेले असून सदर प्रशांत बनकर या नावाची व्यक्ती पोलीस नसून त्या व्यक्तीच्या रुममध्ये भाडेकरू म्हणून या डॉक्टर संपदा मुंडे या राहत होत्या. प्रशांत बनकर हा भाडेतत्त्वावरती रूम देत असल्यामुळे त्यांनी भाडेतत्त्वावर राहण्यासाठी प्रशांत बनकर याची रुम घेतली होती.

या प्रकरणामध्ये ज्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांचे नाव पुढे येत असुन लवकरच संपुर्ण चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्य असत्य समोर येईलच परंतु तो पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.फलटण येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नियोजीत दौरा असुन मुख्यमंत्री या प्रकरणाची सखोल चौकशी करून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध राहतील का?लवकरच या प्रकरणात कोण दडपशाही करत आहेत व या अगोदर डॉ.संपदा मुंडे यांच्यावर कोण दबावतंत्राचा वापर करत होते व या डॉ.मुंडे यांच्या विरोधात कुठली चौकशी चालू होती हे लवकरच समोर येईल.


Post a Comment

0 Comments