सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
लोणंद येथे रुममेटनेच केली मित्राची हत्या, आरोपी दोन तासात जेरबंद.
लोणंद पोलीसांची दमदार कामगिरी दोन तासात केला खुनाचा उलगडा
लोणंद पोलीस स्टेशन हददीत मौजे लोणंद ता.खंडाळा गावात माळीआळी येथे शिक्षणाकरीता
भाडयाने खोली करुन रहात असलेल्या एका मुलाने त्याच्या रुममधील दुस-या मुलाचा कोणीतरी खुन केला
आहे. असा डायल 112 वर फोन करुन माहीती दिली. त्या कॉलवरुन लागलीच तेथे पोलीस अधिकारी व पोलीस
अंमलदार पोहोचले. त्यावरुन कॉल केलेल्या मुलाकडे विचारपुस करुन मयत मुलगा गणेश संतोष गायकवाड वय 22
वर्षे रा. पिंपळसुटी ता. शिरुर जि. पुणे सध्या रा. लोणंद माळआळी ता.खंडाळा जि.सातारा यांचे नातेवाईकांना बोलावुन
घेतले तसेच त्यांचे फिर्यादीवरुन लोणंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 439/2025 बी. एन. एस. कलम 103 (1)
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरबाबत वरिष्ठांना तसेच स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना
कळविण्यात आले होते.
मा. श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर मॅडम अपर पोलीस अधीक्षक
सातारा यांनी सपोनि सुशिल भोसले यांना सदर गुन्हा उघडकिस आणणेबाबत व आरोपींस ताब्यात घेणेकामी सुचना
दिल्या. त्याप्रमाणे श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तसेच श्री. अरुन देवकर पोलीस निरीक्षक
स्थानिक गुन्हे शाखा सातारा सपोनि सुशिल भोसले यांनी त्यांचे डी. बी. पथकाच्या सोबत पोलीस अंमलदार यांच्या
वेगवेगळया टिम बनवून सोबत सपोनि. रोहित फारणे, परितोष दातीर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची वेगळी टिम
बनवुन त्यांना आरोपीची माहिती घेवुन त्यांचा शोध घेणेकरीता तसेच गोपणिय माहिती प्राप्त करण्याकरीता मार्गदर्शन
करुन रवाना केले. श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तसेच श्री. अरुन देवकर पोलीस
निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी समक्ष भेट देवुन मार्गदर्शन केले आहे. तसेच फोरेंसिक टिम, फिंगरप्रिंट
टिम व डॉग स्कॉड यांनी घटनास्थळी भेट देवुन पुरावे हस्तगत केले आहेत. विधीसंघर्ष बालक यास मा. हुजुर बाल
न्यायालयात हजर करुन पुढील योग्य तो तपास करीत आहोत.
तपासादरम्यान ज्या मुलाने डायल 112 वर कॉल केला होता त्यांचेकडे सहायक पोलीस निरीक्षक
सुशिल भोसले, रोहित हेगडे पोलीस उपनिरीक्षक तसेच डी. बी. पथकाने बुध्दीकौशल्याचा वापर करुन विचारपुस केली
त्यावेळी तो काही प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ राहिला त्यांचकडे होत असलेल्या प्रश्नांचा भडीमारापुढे त्याने नांग्या
टाकुन सदरचा गुन्हा किरकोळ क्षणिक रागातुन आपनच स्वता केल्याचे कबुल केले आहे.
सदरची कारवाई मा. श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, मा. डॉ. वैशाली कडुकर मॅडम अपर
पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, श्री. अरुन देवकर पोलीस
निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सुशिल
बी.भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोउनि रोहित हेगडे, पोलीस हवालदार राम तांबे, राहुल वाघ, नितीन भोसले, सतिश
दडस, प्रमोद क्षीरसागर, योगेश कुंभार, बापुराव मदने, विठठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, सचिन
कोळेकर, अवधुत धुमाळ, संजय चव्हाण, शेखर शिंगाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला असुन सदर गुन्हयाचा तपास
सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले हे करीत आहेत. सदर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे या
चांगल्या कामगीरीबाबत सर्व स्थरावरुन कौतुकाची थाप मिळत आहे.

Post a Comment
0 Comments