Type Here to Get Search Results !

ओंकार वृद्धाश्रमात सामाजिक कार्यकर्त्यांकडून औषध व प्रथमोपचार साहित्याचे वाटप.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

ओंकार वृद्धाश्रमात सामाजिक कार्यकर्त्यांकडून औषध व प्रथमोपचार साहित्याचे वाटप.



कुरवली (ता. फलटण), दि. 10 नोव्हेंबर — समाजसेवेचा सुंदर उपक्रम राबवत ज्येष्ठ नागरिक संघ - फलटण संचलित "ओंकार वृद्धाश्रम" येथे आज प्रत्येक वृद्ध  आज्जी आजोबांना कफ सिरप औषध, प्रथमोपचार (First Aid) साहित्य, आणि केळी भेट देण्यात आली.


या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते अजय शिंदे, चिंतामणी मेडिकलचे तुषार कुचेकर, विजयभाऊ सूर्यवंशी, रशीद शेख, रणजितसिंह खानविलकर, अमृत पवार, पै. प्रकाश तेली, संदीप बिडवे, शैलेश इंगळे, शैलेश नलवडे, तसेच लॅब असिस्टंट प्रशांत बनकर साहेब यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


या उपक्रमाद्वारे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आणि त्यांच्या दैनंदिन गरजांमध्ये मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी यापुढेही अशा प्रकारच्या सेवा उपक्रमांद्वारे समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला.


हा उपक्रम वृद्धाश्रम प्रशासन व रहिवाश्यांनी कौतुकास्पद ठरवला असून, समाजातील इतरांनीही अशा कार्यातून प्रेरणा घ्यावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



---

Post a Comment

0 Comments