सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सातारा तालुका पोलीस ठाणे हददीत एकुण 4 लाख 46 हजार 800 रुपये चा मुददेमाल हस्तगत.
(सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी पथकाची कामगिरी)
सातारा तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस हवालदार राजु शिखरे यांना गोपनिय माहिती मिळाली होती की शेंद्रे
गावच्या हददीत काही इसम चारचाकी वाहनामध्ये बेकायदेशीर रित्या विदेशी दारु वाहतुक करुन विक्री करता आणणार आहेत
त्यानुसार पथक तयार करुन सापळा रचण्यात आला.
सदर माहितीच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा,
श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली सातारा
तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी सदर गोपनिय माहितीनुसार डीबी पथकास सदर माहितीच्या
पडताळणी करुन कारवाई करण्यास कळविले होते त्यानुसार डीबी पथकाने दिनांक 07/11/2025 रोजी रात्री 23.00 वा चे
सुमारास सातारा तालुका पोलीस ठाणेचे शेद्रे गावचे हददीमध्ये पुणे ते कोल्हापुर जाणारे हायवे रोडला मारुती स्विफ्ट कार
क्रमांक एमएच 11 एके 2092 ही थांबवुन गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता गाडीतील इसमांने विचारलेल्या प्रश्नांची
उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तसेच सदर गाडीची तपासणी करणेस आडकाठी केल्याने गोपनिय माहितीची खात्री झाल्याने सदर
गाडीची दोन पंचासमक्ष तपासणी करुन 96 हजार 800 रु. किंमतीची विदेशी दारु व अंदाजे 3 लाख 50 हजार रू किंमतीचे
चारचाकी वाहन असा एकुण 4 लाख 46 हजार 800 रुपये चा मुददेमाल हस्तगत करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक
तपास पोलीस हवालदार किरण निकम हे करित आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक साो, सातारा, तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती
वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी
अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. विनोद नेवसे
सहा.पोलीस निरीक्षक, पोहवा मनोज गायकवाड, पोहवा राजु शिखरे, पोहवा पंकज ढाणे, पोकॉ संदिप पांडव, पोहवा दादा
स्वामी, पोहवा प्रदीप मोहिते यांनी केलेली आहे.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस
अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले
आहे.

Post a Comment
0 Comments