सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण करणा-या आरोपीनां शिरवळ पोलिसांनी केले जेरबंद.
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भादे ता खंडाळा गावचे हद्दीत वीर धरण परिसरात इन्स्टाग्राम
अकाऊंटवरुन चॅटींग करुन महीला बोलत असल्याचे सांगून भेटायला बोलवून घेतले. त्यानंतर मारुती अल्टो कार
क्रमांक एमएच १२ एनई ३९७२ या कारमध्ये बसवून अपहरण करुन फायबर काठीने, हाताने, तोंडावर पाठीवर
मारहाण केली. घडले घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर, अँट्रोसिटी व विनयभंग अत्याचाराचा गुन्हा दाखल
करुन जेल मध्ये टाकण्याची अशी भिती घालून सदरची मारुती अल्टो कार खंडणीस्वरुपात नावावर करुन देणेस
सांगितले. म्हणुन शिरवळ पोलीस ठाणेत गुन्हा दाखल झालेला आहे.
सातारा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी साो, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर साो, फलटण
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे साो, यांनी घडलेल्या घटनेची माहिती मिळालेवर शिरवळ पोलीस
ठाणेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपी शोधण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक
यशवंत नलवडे यांनी वेगवेगळी पथके तयार करुन तपास सुरु केला. तेव्हा एका तासामध्ये शिरवळ पोलीसांनी
तक्रारदार यांनी सांगितलेल्या इसमांचा शोध शिरवळ गावात घेण्यास सुरुवात केली. कारवाई दरम्यान १. युट्युब
पत्रकार किरण प्रकाश मोरे, २. मनसे खंडाळा तालुका अध्यक्ष इरफान दिलावर शेख ३. सातारा जिल्ह्यातून हद्दपार
असलेला विशाल महादेव जाधव सर्व रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा या आरोपीना अटक करण्यात आली
असून नमुद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सतिश आंदेलवार हे करीत आहेत. तरी अश्याप्रकारचे या
आरोपींचे विरोधात कोणाची काहीएक तक्रार असल्यास निर्भिडपणे पुढे येवून शिरवळ पोलीस ठाणेस तक्रार
नोंदविण्याचे अवाहन पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.
सदरची कारवाई मा. तुषार दोशी साो, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस
अधीक्षक सातारा,
श्री. विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री.
यशवंत नलवडे पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे, सहा. पोलीस निरिक्षक किर्ती म्हस्के, पोलीस उपनिरिक्षक
सतिश आंदेलवार, पोलीस अंमलदार विलास यादव, सचिन वीर, सुरेश मोरे, गिरिश भोईटे, अजय जुंझार, अरविंद
बा-हाळे, सचिन चव्हाण, मंगेश मोझर, अक्षय बगाड, रामकिसन केकाण, अक्षय नेवसे, योगेश चिमटे, ज्ञानेश्वरी
भोसले, निशा कांबळे, यांनी सहभाग घेतला आहे. सदरच्या उल्लेखनिय कामगीरीबाबत सर्व पोलीस अधिकारी व पोलीस
अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधिक्षक, श्री विशाल
खांबे साो, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment
0 Comments