Type Here to Get Search Results !

वाहनांच्या बॅट-या चोरणारी टोळीला शाहुपुरी पोलिसांनी केले जेरबंद.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

वाहनांच्या  बॅट-या चोरणारी टोळीला शाहुपुरी पोलिसांनी केले जेरबंद.



शाहुपूरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून बॅट-या चोरीतील आरोपी अटक करुन चारचाकी

वाहनांचे १० बॅट-या हस्तगत.

दिनांक ०६/११/२०२४ रोजी श्री. रमेश रघुनाथ शेडगे वय - ३९ वर्षे धंदा चालक रा. करंजेपेठ सातारा

यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०५/११/२०२५ रोजी रात्रौ १०.३० ते दिनांक ०६/११/२०२५ रोजी सकाळी

०८.३० वाजण्याच्या दरम्यान झेड पी कॉलणी, म्हसवेरोड, करंजे सातारा येथील अमोल गार्डे यांच्या घराचे समोर

उभा केलेल्या ट्रकवरील १५,०००/- रु. किं.चे दोन अॅमरॉन कंपणीच्या बॅट-या कोणीतरी अज्ञात चोटयाने चोरुन

नेलेल्या आहेत.

सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर श्री. सचिन म्हेत्रे, पोलीस निरीक्षक सो शाहुपूरी पोलीस स्टेशन यांचे

सुचना नुसार पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आरोपीचा शोध घेत असताना श्री. सचिन म्हेत्रे, पोलीस

निरीक्षक साो यांना गोपनीय बातमीदार व फिर्यादी यांचेकडून माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा त्यांचे

परीसरात राहणारे इसमानेच केलेला आहे. त्यानंतर त्यांनी सदरची माहीती तपास पथकास देवून आरोपीस

अटक करणे बाबत सुचना दिल्यानंतर सदर अधिकारी कर्मचारी यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास पकडून

अटक केली.त्याचेकडे विचारपुस करता त्याने गेले ३ महीण्याच्या कालावधीत वाढेफाटा, करंजे परीसरात उभा

असलेल्या चारचाकी वाहनातून चोरलेल्या सदर गुन्हयातील २ बॅट-या व इतर चारचाकी वाहनाचे ८ अशा

एकुण ५५,०००/- रुपये किंततीचे १० चारचाकी गाडयांचे बॅट-या हस्तगत केलेल्या आहे. सदर गुन्हयाचा पुढील

तपास म.पो.हवा. सोनानी माने या करीत आहेत.

सदरची कारवाई श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती. वैशाली कडूकर, अपर पोलीस

अधीक्षक सातारा, श्री. राजीव नवले, उप विभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग सातारा यांच्या

मार्गदर्शनाखाली श्री.सचिन म्हेत्रे, पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस स्टेशन. पोलीस उप निरीक्षक, विजय शिर्के,

म.पोलीस हवालदार सोनाली माने, पोलीस हवालदार निलेश काटकर, सुरेश घोडके, संदिप मदने यांनी केलेली

आहे.

Post a Comment

0 Comments