Type Here to Get Search Results !

पाच महिन्यापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या खुनाचा उलगडा.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

पाच महिन्यापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या खुनाचा उलगडा.



नागठाणे, ता.जि.सातारा येथील ५ महिन्यापासून मिसींग व्यक्तीचा खुन, स्थानिक गुन्हे शाखेच्या कौशल्यपूर्ण तपासाअंती आरोपी अटक 

८ जुन २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. च्या सुमारास संभाजी बाळू शेलार, वय - ४३ वर्षे, रा. पाडळी ता. जि. सातारा

हे कोणास काही एक न सांगता निघून गेले बाबत त्यांची बहिण बेबी सुनिल माळी, रा. हजारमाची ता.कराड, जि.सातारा

यांनी दिले खबरीवरुन बोरगाव पोलीस ठाणे मिसींग रजिष्टर क्रमांक २२/२०२५ दिनांक २२/०६/२०२५ प्रमाणे नोंद

करण्यात आली होती.

सदर मिसींगचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत चालु होता. दरम्यान दिनांक १४/११/२०२५ रोजी

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत विश्वसनीय माहिती प्राप्त झाली

की, मिसिंग व्यक्ती संभाजी बाळू शेलार याचा त्याच्या गावातील एका व्यक्तीने खुन केला आहे. त्या अनुशंगाने त्यांनी

सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे यांच्या अधिपत्याखाली एक तपास पथक तयार करुन त्यांना प्राप्त

माहितीची खात्री करुन सदर संशयीत इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे मिसींग व्यक्तीबाबत तपास करुन पुढील कारवाई

करण्याच्या सुचना दिल्या.

त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने पाडळी गावात व परिसरात जावुन बातमीच्या अनुषंगाने आणखी

माहिती प्राप्त करुन सदर संशयीत इसमाचा पाडळी, ता. जि. सातारा गावामध्ये शोध घेतला. त्यास पाडळी गावातुन ताब्यात

घेवून त्याचेकडे Interrogation Skill चा वापर करुन मिसींग व्यक्ती बाबत विचारपूस केली असता त्याने संभाजी बाळू

शेलार याचेशी झालेल्या किरकोळ वादातून मी माझ्या राहत्या घरामध्ये धारदार हत्याराने खुन करुन दुसऱ्या दिवशी सकाळी

मी त्याची बॉडी माझे घराचे पाठीमागे जाळून टाकली आहे असे सांगीतल्याने त्याचे विरुध्द स.फौ.प्रविण शिंदे, नेमणुक -

बोरगाव पोलीस ठाणे यांनी दिले फिर्यादीवरुन गु.र.नं.२९७/२०२५ भा.न्या.सं.क. १०३ (१), २३८ अन्वये नोंद केला असून

त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे, धोंडीराम वाळवेकर,

पो.उ.नि. विश्वास शिंगाडे, पारीतोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के,

शरद बेबले, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, सचिन साळूंखे, प्रविण फडतरे, अमित माने, अरुण पाटील, अमित सपकाळ,

गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, अविनाश चव्हाण, ओंकार यादव, स्वप्निल शिंदे, अमित झेंडे, मोहन पवार, धिरज महाडीक,

रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, विशाल पवार, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, शिवाजी गुरव, पंकज बेसके बोरगाव

पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, ज्ञानेश ढाणे, विशाल जाधव, समाधान जाधव, दिपक मांडवे, प्रशांत

चव्हाण, सतिश पवार,

निलेश गायकवाड यांनी सदरची कारवाई केली असुन ५ महिण्यापासुन मिसींग व्यक्तीचा खुनाचा

संवदनशिल गुन्हा कौशल्यपुर्ण तपास करुन उघड करुन आरोपीस अटक केल्याबददल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे

पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments