सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी हरिदास सावंत ( सर)
साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागाची विद्यार्थिनी कुमारी दिशा बोंद्रेची राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड.
महाराष्ट्र शासन शालेय क्रीडा व युवक सेवा संचालनालय, परभणी जिल्हा क्रीडा परिषद , परभणी जिल्हा क्रीडा कार्यालय आणि परभणी जिल्हा खो खो असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने परभणी येथे पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो खो स्पर्धेत साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग , साखरवाडी ( तालुका फलटण , जिल्हा सातारा) या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी दिशा राहुल बोंद्रे हीची १४ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे.राष्ट्रीय खो खो स्पर्धा लवकरच राजस्थान राज्यात संपन्न होणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय चमकदार कामगिरीची दखल घेऊन कुमारी दिशाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिला साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातील सहाय्यक शिक्षक सर्वस्वी श्री रोहिदास बापू गावित आणि श्री कमलाकर गांगुर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशात तिचे पालक श्री राहुल बोंद्रे यांचाही मोलाचा वाटा आहे.कुमारी दिशा , तिचे मार्गदर्शक आणि तिच्या पालकांचे साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील , साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील , संचालक माननीय श्री राजेंद्र शेवाळे , श्री माणिकआप्पा भोसले , श्री राजेंद्र भोसले तसेच संस्थेच्या सचिव तथा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी , परिसरातील पालकांनी विशेष अभिनंदन करून कुमारी दिशा हिच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments