Type Here to Get Search Results !

घरफोडी करणारी टोळी बोरगाव पोलिसांच्या कडून जेरबंद.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

घरफोडी करणारी टोळी बोरगाव पोलिसांच्या कडून जेरबंद.



 बेकायदा बिगरपरवाना पिस्टल बाळगुन घरफोडी करणाऱ्या अठल टोळीचा पर्दाफाश करुन ५घरफोडीचे गुन्हे उघड करणेत बोरगाव डी. बी. पथकाला यश.बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत खुनाचे गंभीर गुन्हे दाखल असुन त्याचा तपास सुरु असताना सतत बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल होत होते. सदर घरफोडी चोरट्याचा शोध घेवुन गुन्हे उघड करण्याच्या सुचना बोरगाव पोलीस ठाणेचेप्रभारी डी. एस. वाळवेकर, सहा.पोलीस निरीक्षक यांनी डी. बी. पथकाला सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डी. बी. पथक हे अज्ञात आरोपीचा शोध तांत्रिक माहितीचे आधारे घेत असताना दि. १८/११/२०२५ रोजी १६.३० वा. चे सुमारास बोरगाव पोलीस ठाणेचे प्रभारी डी. एस. वाळवेकर, सहा. पोलीस निरीक्षक यांना इसम नामे नवनाथ प्रकाश गोळे रा. कवठेकरवाडी ता. पाटण जि.सातारा हा त्याचे दोन साथीदार हे आष्टे (पुर्नवसन) ता.जि. सातारा येथे करीझ्मा कंपनीची पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली व काळे रंगाची स्लेंडर मोटार सायकल नं. MH 11 CN-1147 असा नंबर असलेल्या मोटार सायकल वरुन येणार असुन त्यातील नवनाथ गोळे याने काळ्या रंगाची हुडी जर्किन व काळ्या रंगाचा बर्मुडा परिधान केलेली आहे. त्याचे जवळ देशी बनावटीचे पिस्टल आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार पोलीस अंमलदार यांना सदर ठिकाणी जावुन छापा कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस अंमलदार १६.५० वा. चे सुमारास आष्टे (पु) ता. जि. सातारा गावचे हद्दीत महादेव मंदिराचे परीसरात सापळा लावुन थांबले, असता बातमीतील वर्णनाप्रमाणे असणारा एक इसम हा नंबर प्लेट नसलेल्या पांढऱ्या रंगाच्या करीझ्मा मोटार सायकल वरुन नागठाणे बाजूकडून महादेव मंदिराचे बाजुकडे येताना दिसला. त्याने मोटार सायकलवर पाठीमागे एक आकाशी रंगाचा टि शर्ट व जर्किन व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला इसम व करिझ्मा मोटार सायकलचे पाठीमागे एक काळ्या रंगाचे स्लेंडर मोटार सायकल नं. MH 11 CN-1147 वर फिक्कट हिरवट रंगाचा फुल बाह्याचा टि शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट घातलेले असे तिन इसम आले व ते मंदिराचे पाठीमागील बाजूस जावून थांबले. आम्ही व पोलीस अंमलदार यांनी अचानक १७.१० वा. छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे (१)नवनाथ प्रकाश गोळे वय २७ रा. कवठेकरवाडी ता. पाटण जि. सातारा, (२) ऋषिकेश सुर्यकांत सुळ वय २४ वर्षे मुळ रा. माजलगाव ता. जि. बिड सध्या रा. शिक्रापूर रोड, विशाल गार्डन समोर, मेदनकरवाडी चाकन जि.पुणे (३) सुदर्शन अशोक मोहिते वय २७ वर्षे रा. आष्टे (पु) ता.जि.सातारा असे असल्याचे सांगितले. इसम नामे नवनाथ प्रकाश गोळे रा. कवठेकरवाडी ता. पाटण जि. सातारा याची अंगझडती घेतली असता त्याचे बरमुडा पँन्टच्या डाव्या खिशामध्ये एक देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतूस मिळुन आले. त्यास पिस्टल जवळ बाळगणेचा परवाना आहे काय

असे विचारले असता त्याने त्याचेकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगुन सदरचे पिस्टल स्वःताचे रक्षणाकरीता आणलेचे सांगितले.ताब्यात घेण्यात आले इसम (१) नवनाथ प्रकाश गोळे, (२) ऋषिकेश सुर्यकांत सुळ, (३) सुदर्शन प्रकाश मोहिते याचे अंगझडती मध्ये एकुण५,०६,१००/- रु. किंमतीचे एक लोखंडी धातुचे देशी बनावटीच्या प्लेटींगचे पिस्टल दोन पिवळ्या धातुचे जिंवत काडतुसह मॅगझीन, पांढऱ्या रंगाची हिरो कंपनीची करिझ्मा मोटार सायकल तिचे पुढे व पाठीमागे नंबरप्लेट नसलेली, एक निळ्या रंगाचा व काळ्या प्लॅस्टिकच्या मुठ असलेला

TAPARIA BC 36 बोल्ट कटर पुढील दोन्ही बाजूस धारदार कैची असलेला, एक अॅप्पल कंपनीचा आय फोन १३ प्रो मॉडेलचा मोबाईल, एक ओपो

कंपनीचा A59 मॉडेलचा ५क्र मोबाईल, एक सॅमसंग कंपनीचा गॅलॅक्सी A14 मॉडेलचा 5G मोबाईल एक बंद स्थितीतील रेड मी कंपनीचा मोबाईल,

रोख रक्कम ५०० दराच्या एकुण २० चलनी नोटा, एक लोखंडी कटावणी एक अॅप्पल कंपनीचा आय फोन १३ मॉडेलचा मोबाईल, एक वन प्लस

नॉर्ड कंपनीचा 2 T मॉडेलचा 5G मोबाईल, रोख रक्कम ५०० दराच्या २ व १०० रु दराच्या ५ चलनी नोटा, एक काळ्या रंगाची स्लेंडर मोटार

सायकल तिचा RTO रजि. नं. MH-11-CN-1147 येणे प्रमाणे वरील वर्णनाचा माल आरोपींचे कब्जात मिळुन आलेने त्यांचेविरुध्द बोरगाव पोलीस

ठाणेस गु. रजि.नं.३०७/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला.

सदर आरोपींना दि. १९/११/२०२५ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सातारा कोर्टात भेटवुन पोलीस कस्टडीची मागणी केली

असता त्यांची दि.२१/११/२०२५ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिंमाड मंजुर करणेत आली आहे. सदर पोलीस कस्टडी रिंमाड मध्ये अटक आरोपीकडे

पारंपारिक तपास पद्धती तसेच Intrrogation Skill चा वापर करुन अधिक तपास केला असता आरोपी नामे (१) नवनाथ प्रकाश गोळे वय २७

रा. कवठेकरवाडी ता. पाटण जि. सातारा, (२) ऋषिकेश सुर्यकांत सुळ वय २४ वर्षे मुळ रा. माजलगाव ता. जि. बिड सध्या रा. शिक्रापूर रोड,

विशाल गार्डन समोर, मेदनकरवाडी चाकन जि.पुणे (३) सुदर्शन अशोक मोहिते वय २७ वर्षे रा. आष्टे (पु) ता. जि. सातारा (४) कृष्णा तुकाराम

नरडे रा. माजलगाव ता. जि. बिड यांनी एकत्र मिळुन गेले काही दिवसात बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरीचे गुन्हे केलेचे सांगितले. सदर

आरोपींनी कटर व कटावणीचे सहाय्याने बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे नागठाणे येथील (१) गु. रजि.नं. २६८/२०२५ भारतीय न्याय संहिता

२०२३ कलम ३०५,३३१ (३) (२) गु. रजि.नं. २५४ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३१ (३) मौजे पाडळी येथील (३) गु. रजि. नं.३०२ / २०२५

भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५.३३१ (३), ३३१(४) (४) गु. रजि. नं. ३०३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५.३३१ (३). ३३१ (४)

मौजे अतित येथील (५) गु. रजि.नं. २९९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५.३३१ (३) हे गुन्हे केले असलेने निष्पन्न झाले आहे. एकुण

८,४६,१००/- रु. किंमतीचे आरोपीकडुन सोन्याचे, चांदीचे दागिने, दोन वापरत्या मोटार सायकली, पिस्टल, ओरापींचे वापरते मोबाईल व रोख रक्कम

आजप्त करणेत आली आहे.

सदरची कारवाई मा. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, मा. राजीव नवले,

पोलीस उपअधीक्षक, सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली धोंडीराम वाळवेकर, सहा. पोलीस निरीक्षक, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक

दिपक कारळे, सुधीर भोसले स.फौ. प्रविण शिंदे, पो.हे.कॉ. दिपककुमार मांडवे, निलेश गायकवाड, पो.ना.प्रशांत चव्हाण, पो.कॉ. सतीश पवार,

विशाल जाधव, समाधान जाधव, संजय जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments