Type Here to Get Search Results !

श्रीराम जवाहर कारखान्याचा ऊसदर ३३०० रुपये जाहीर.

 

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

श्रीराम जवाहर कारखान्याचा ऊसदर ३३०० रुपये जाहीर.



फलटण येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शे.स.सा.का. लि., हुपरी यळगुड ऑपरेटर

ऑफ श्रीराम स.सा.का.लि., फलटण या भागीदीरी कारखान्याने सन २०२५-२६ या चालू गळीत

हंगामामध्ये येणाऱ्या ऊसासाठी उंच्चाकी दर रु.३३००/- रुपये इतका दर जाहीर केला आहे.

एफआरपीनुसार ३००९ रुपये इतका दर असताना २९१ रुपये अधिक असा ३३०० रुपये दर

देणेचा निर्णय घेण्यात आला. ऊस गाळपानंतर १५ दिवसात एकरक्कमी प्रतिटन ३२०० रुपये व

दिवाळी सणासाठी १००/- रुपये असा एकुण ३३०० रुपये दर देण्यात येईल, अशी माहिती

श्रीराम कारखान्याचे चेअरमन श्री. डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी दिली.

मा.श्री.कल्लाप्पाण्णा आवाडे, मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा.श्री. प्रकाश आवाडे

आणि मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांच्या

हिताचा विचार करुन हा निर्णय जाहीर केला.

तेंव्हा कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी गाळप हंगाम २०२५-

२६ करीता पिकविलेला आपला सर्व ऊस श्रीराम जवाहर कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा,

असे अवाहन श्रीराम कारखान्याचे चेअरमन, श्री. डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments