Type Here to Get Search Results !

कै.श्रीमती निर्मला भार्गव वाळिंबे यांचे स्मरणार्थ वाळिंबे परिवाराकडून साखरवाडी विद्यालय प्राथमिक विभागास एक लाख रुपये किमतीचे फर्निचर प्रदान :

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

कै.श्रीमती निर्मला भार्गव वाळिंबे यांचे स्मरणार्थ वाळिंबे परिवाराकडून साखरवाडी विद्यालय प्राथमिक विभागास एक लाख रुपये किमतीचे फर्निचर प्रदान :



साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय प्राथमिक  विभागात सुमारें३५ वर्षे अखंड सेवा केलेल्या प्राथमिक विभागाच्या माजी मुख्याध्यापिका कै.श्रीमती निर्मला भार्गव वाळिंबे यांचे स्मरणार्थ त्यांच्या दहाव्या स्मृतिदिनी वाळिंबे परिवाराकडून साखरवाडी विद्यालय प्राथमिक विभागासाठी एकूण एक लाख रुपये किंमतीची आठ मजबूत कपाटे प्रदान करण्यात आली.याचवेळी संस्थेच्या बालक मंदिर आणि प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आले.साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री राजेंद्र शेवाळे आणि श्री माणिक आप्पा भोसले यांनी त्याचा स्वीकार केला.याप्रसंगी वाळिंबे परिवारातील श्री संजय वाळिंबे , सौ श्रद्धाताई वाळिंबे , श्री नंदकुमार वाळिंबे , सौ शुभदा वाळिंबे , श्रीमती मनोरमा वाळिंबे तसेच साखरवाडी शिक्षण संस्थेच्या सचिव तथा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिलाताई जगदाळे , साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह तथा माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक श्री हरिदास सावंत सर , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री संदीप चांगण सर , सर्व शिक्षिका भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी श्री हरिदास सावंत यांनी कै.श्रीमती निर्मला भार्गव वाळिंबे यांच्या तत्कालीन आठवणींना उजाळा देवून त्यांना विनम्र अभिवादन केले.त्यांच्या स्नुषा पुण्याच्या राणी लक्ष्मीबाई मुलींचे मिलिटरी स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सौ श्रद्धाताई वाळिंबे व कै.वाळिंबे बाईंचे मोठे चिरंजीव श्री संजय वाळिंबे यांनीही मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी दिशा राहुल बोंद्रे हीची राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली असल्याने तिला व तिचे मार्गदर्शक श्री रोहिदास गावित सर यांना सन्मानित करण्यात आले. आभार श्री संदीप चांगण सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर यांनी विशेष परिश्रम घेऊन नियोजन केल्याबद्दल वाळिंबे परिवाराकडून आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments