Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यात ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी स्वाभिमानी आक्रमक.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फलटण तालुक्यात ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी स्वाभिमानी आक्रमक.



*राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक २४ रोजी साखरवाडी तालुका फलटण येथे ऊस दराच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकणार*

फलटण तालुक्यातील साखर कारखान्यानी ३५०० च्या खाली ऊसदर अमान्य असून सातारा सातारा जिल्ह्यातील कारखान्याने ३३०० ते ३५०० रुपयांच्या दरम्यान दर देत गाळप हंगामाला सुरुवात केली आहे. मात्र

फलटण तालुका पुन्हा एकदा ऊस आंदोलनाच्या ज्वालामुखीवर उभा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा न्याय्य दराचा सवाल तापलेला असताना, तालुक्यातील स्वराज, शरयू, श्रीराम-जवाहर आणि श्री दत्त इंडिया प्रा. लि. या चारही साखर कारखान्यांनी उस दराची कोंडी फोडली नाही. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामधील बैठकीमध्ये एकत्र येऊन ३००० रुपये प्रतिटन हा संयुक्त दर बैठकीत लादण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा सरळ अपमान करणारी ही भूमिका उघड होताच संतापाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे स्वाभिमानी आक्रमक झाले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ३५०० च्या खाली दर स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका भूमिका स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी घेतली आहे. 


स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम-जवाहर कारखान्याने जाहीर केलेला ३३०० रुपयांचा दर फक्त कागदी असल्याचे उघड झाले आहे. ३२०० रुपये १५ दिवसात आणि फक्त १०० रुपये दिवाळीला असा अपमानजनक प्रस्ताव शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला आहे. तो अमान्य असल्याचं स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी सांगितले गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे २०० रुपये दुसरे हप्ते अजूनही थकित आहे. हा दिवसाढवळ्या अन्याय असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्पष्ट  केले आहे. ३२०० रुपयांना उसाचं कांडके मिळणार नाही.शेतकऱ्यांचे  सभेतून फलटण तालुक्यातील चारही कारखान्यांविरोधात तीव्र आणि टोकाची लढाई घोषित होणार असल्याचे संकेत स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


कमी दराचा कारखानदारांचा संगनमत प्रस्ताव, मागील वर्षाचे थकित हप्ते, आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक गदाया सर्वांची प्रचंड नाराजी आता उफाळून आली आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुका आता निर्णायक रणांगणात उतरणार आहे.उद्या दिनांक २४ रोजी ठीक ३ वाजता साखरवाडी बस स्थानक, तालुका फलटण येथे राजू शेट्टी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 


ऊसदरासाठीचा आवाज आता फक्त आवाज राहणार नाही… तो एल्गार ठरणार आहे अशी प्रतिक्रिया  स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. उसाच्या दराची लढाई यशस्वी करण्यासाठी डॉ. रवींद्र घाडगे,युवक राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले, आप्पा ठोंबरे, दादा जाधव यांनी पुढाकार घेतला आहे.


Post a Comment

0 Comments