सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पाडेगाव पंचायत समिती गणातुन अक्षय सोडमिसे यांच्या नावाची जोरदार चर्चा.
पाडेगाव पंचायत समिती गणातुन युवा नेतृत्व युवकांचे आशास्थान म्हणून युवकांनी अक्षय सोडमिसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे अक्षय सोडमिसे हे कट्टर समर्थक मानले जातात,व त्यांचा मित्र परिवार हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाडेगाव गण पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी नविन तरुण, तडफदार चेहरा म्हणून त्यांच्या नावाला पसंती देण्यात येत आहे.
पाडेगाव,कुसुर,मिरेवाडी,रावडी खु,रावडी बु,परहर, मुरूम, तडवळे, खामगाव,खराडेवाडी या गावांमध्ये अक्षय सोडमिसे यांच्या बरोबर तरुणांची फार मोठी फळी आहे. युवकांने सांगितले की परंपरेगत घराणेशाहीची उमेदवारी आम्हाला मोडीत काढायची असून प्रत्येक वेळेस नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी अशी अपेक्षा तरुणांमधून व्यक्त केली जात आहे. उमेदवारी देणं किंवा न देणे हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल,जो निर्णय असेल तो मला मान्य असेल, परंतु पक्षश्रेष्ठींनी युवकांच्या अपेक्षांचा ही योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पंचक्रोशीतील युवकांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments