सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पुळकोट ता.माण येथील संवेदनशील खुनातील आरोपी दोन महिन्यांनंतर जेरबंद.
मौजे पुळकोट तालुका माण येथील क्लिष्ट व संवेदनशील खुनाचा गुन्हा दोन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर उघड करुन आरोपी जेरबंद.
दिनांक 12/09/2025 रोजी सायंकाळचे सुमारास मौजे पुळकोटी तालुका माण जिल्हा सातारा याठिकाणी एका घरात 65 वर्षीय
ज्येष्ट नागरीक महिलेचा ती घरात एकटी असताना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून निर्घृन खून करुन पुरावे नष्ट केलेबाबत वगैरे
मजकुरचे फिर्यादीवरून म्हसवड पोलीस ठाणे गुरनं. 299/2025 भा.न्या.सं.क. 103 (1), 238 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचे
घटनास्थळावरील परिस्थितीवरुन गुन्हा उघडकीस आणणेकामी व तपासाकामी संभ्रमावस्था निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करुन अज्ञात
आरोपीने पुरावे नष्ट केलेले होते.
नमुद गुन्हा हा जेष्ठ नागरीक महिलेसंबधी अत्यंत संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी,
अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी श्री. रणजित सावंत उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग दहिवडी, श्री. अरूण
देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे
शाखेकडील तसेच म्हसवड पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची विशेष पथके तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस
आणुन आरोपीस जेरबंद करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
मौजे पुळकोटी तालुका माण तसेच पंचक्रोशीत हा गुन्हा घडल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेशांतरे करुन अहोरात्र फिरुन
खास व गोपणीय बातमीदार तयार करुन त्यांचेकडुन प्राप्त होणाऱ्या बातम्या व संशयितांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन मिळालेल्या
बातमींचे व त्यासंबधी घटकांचे तांत्रिक विश्लेषण तसेच निर्माण झालेल्या शंकांचे निरसण करुन खुन कोणी केला असेल याबाबत माहिती घेत
होते. अशा रितीने गुन्हा उघडकीस आणणेकामी वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांनुसार कसोशीने प्रयत्न करीत होते. दरम्यानचे कालावधीत पोलीस
निरीक्षक श्री. अरुण देवकर यांना गोपणीय बातमीदारातार्फत बातमी मिळाली की, शिरताव ता. माण येथील घटनास्थळी मिळुन आलेल्या हुडी
जर्कंग वापरणारा एक युवक गुन्हा घडलेनंतर काही दिवसापासुन परागंदा झाला आहे अशी त्यांना बातमी मिळाल्याने त्यांचे सुचनानुसार पोलीस
उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखालील पो.हवा. सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, सनी आवटे, गणेश कापरे, राजु कांबळे,
पो.कॉ. धिरज महाडीक, विजय निकम यांचे पथकास सदर इसमाबाबत माहिती काढुन शहानिशा करणे बाबत सुचना दिल्या. त्यानुसार संबधित
संशयित परागंदा इसमाचा शोध घेत असताना, त्याचा ठावठिकाणा शोधुन त्याचे हालचालीवर लक्ष ठेवुन तांत्रिक विश्लेषण करुन, ठोस माहितीच्या
आधारे त्यास ताब्यात घेतले. त्याचेवर सलग पाच ते सहा तास हजारो प्रश्नांचा भडीमार केला. त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी
केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्यास पोलीसांनी गुन्हयाचे कामी अटक केलेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास
पोलीस उपअधीक्षक श्री. रणजीत सावंत, दहिवडी विभाग दहिवडी हे करीत आहेत.
संशयित आरोपीने गुन्हा करतेवेळी पुरावे नष्ट करुन पोलीसांना तपासकार्यात संभ्रमावस्था निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण
केलेली होती. त्याचा फायदा घेवुन तो पोलीसांना मिळुन न येण्यासाठी प्रयत्न देखील करीत होतो. परंतु पोलीसांना घटनास्थळी मिळुन आलेल्या
आरोपीच्या वापरातील हुडी जर्किंग वरील "When granted everything, You can't do Anything, जेव्हा नियतीला सर्व काही मान्य
असते त्यावेळी तुम्ही काहीही करू शकत नाही." ही टॅगलाईन सतत प्ररणा देत होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा सातारा, उपविभागीय
पोलीस अधिकारी कार्यालय वडुज, म्हसवड पोलीस स्टेशन सातारा यांचेकडील तपास पथके चिकाटीने तपासकामी कार्यरत होती. या प्रेरणेतूनच
स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे कडुन सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.
सदर कारवाई मध्ये श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री.
रणजीत सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी वडुज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, सपोनि
रोहित फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, परितोष दातिर, म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे, पोउनि अनिल वाघमोडे, दहिवडी पोलीस
स्टेशनचे सपोनि दत्तात्रय दराडे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार शिवाजी गुरव, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक,
सनी आवटे, अमोल माने, मुनिर मुल्ला, राकेश खांडके, अमित झेंडे, अजय जाधव, हसन तडवी, अमृत कर्पे, अमित सपकाळ, राजू कांबळे,
गणेश कापरे, प्रविण कांबळे, विजय निकम, स्वप्निल दौंड, धिरज महाडीक तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार रविंद्र बनसोडे,
नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत. कारवाईत सहभागी असलेले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे
श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments