सह्याद्री निर्भिड न्यूज
सोमंथळी/तानाजी सोडमीसे
बारामती फलटण रस्त्यावर गवार फाट्याजवळ अपघातात सोमंथळीच्या किरण रासकर या युवकाचा मृत्यू .
बारामती तालुक्यातील गवार फाटा रस्त्यावर मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 6 वाजून 45 मिनिटाच्या सुमारास सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडके सोमंथळी येथील किरण राजेंद्र रासकर वय 28 या युवकाचा मृत्यू झाला .किरण हा दुचाकीने बारामतीकडून सोमंथळी कडे येत होता यावेळी गवार फाट ्याजवळ त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली यात डोक्याला मोठा आघात झाल्याने किरणचा उपचार पुर्वी मृत्यू झाला. गवार फाटा वरील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बारामती ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या व मित्र परिवारांनी च्या ताब्यात दे ण्यात आला या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे प्रोसेस चालू आहे. किरण हा बारामती येथे जॉब करत होता त्याच्या पश्चात आई वडील विवाहित बहीण दोन चुलते दोन चुलत्या तीन चुलत भाऊ दोन चुलत बहिणी असा परिवारा आहे. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या किरणचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याचे गावातील व तालुक्यातील मित्रपरिवार व गावकरी अंत्ययात्रेवरील भावुक झाले.

Post a Comment
0 Comments