सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
ऊसाचे बगॅस घेऊन जाणाऱ्या गाडीने गुलमोहर(शंकेश्वर) वृक्ष मोडला.
काळज सोमेश्वर रोडवर तडवळे गावच्या हद्दीतील रोडच्या कडेला असलेल्या गुलमोहर (शंकेश्वराचे) खोडापासून झाड मोडले असुन विनविभाग त्या वाहनांवर कारवाई करणार का..?
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे" या वाक्यप्रमाने सध्या परिस्थिती राहिली आहे का..?वनपाल व वनक्षेत्रपाल अधिकारी हे किती सतर्क आहेत हे याच्यावरून समजते. वनपाल हे फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत त्यांना फोन करून सुद्धा ते वेळेवर उपस्थित राहू शकले नाहीत. संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये वृक्षतोड हे मोठ्या प्रमाणात होत असून या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी का आहे नक्की गौडबंगाल तरी काय आहे, वनविभागापुढे फार मोठे आव्हान उभे राहिले आहे. एका बाजूने जागतिक तापमानाकडे आपली वाटचाल असताना वन विभागाचे दुर्लक्ष का होत आहे संपूर्ण विनाश होण्याची वेळ आली आहे. वृक्षतोडीच्या विरोधात कायदा हा कडक करण्याची वेळ आलेली आहे. निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला असताना या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कुणाचाही धाक राहिलेला दिसत नाही. वनविभागांनी वृक्ष लागवड केलेल्या पैकी किती पक्षांचे संगोपन करून प्रत्यक्षात किती झाडे जिवंत आहेत व कागदावर किती आहेत याचा हिशोब कोण विचारणार. निसर्ग प्रेमींनी यांमध्ये लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे.

Post a Comment
0 Comments