सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पुसेगाव पोलीसांच्या कडुन ११ किलो गांजा जप्त.
स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पुसेगांव पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई
किंमत रुपये 2 लाख 78 हजार 900 रूपयांचा 11 किलो वजनाचा गांजा जप्त
श्री. तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी
अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांच्या विरूद्ध कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना दिलेल्या
होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार
करून सातारा जिल्हयामध्ये अवैद्य व्यवसाय करणाऱ्या इसमांविरूद्ध गोपनीय बातम्या प्राप्त करून छापा कारवाई
करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक 28/11/2025 रोजी पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी
प्राप्त झाली की, पुसेगांव पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रामोशीवाडी पोस्ट जाखणगांव येथील सगु वहिणीच्या वस्तीतीत एक
इसम त्याचे राहते झोपडीचे आडोशाला गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने गांजाच्या झाडांची लागवड केलेली आहे
त्यानुसार पो. नि. अरूण देवकर यांनी स्थागुशा कडील पोउनि परितोष दातीर व पोलीस अंमलदार यांचे एक
पथक तयार करून सदर पथकास स्थानिक पुसेगांव पोलीस ठाणेकडील अधिकारी स.पो.नि. संदीप पोमण व त्यांचेकडील
पोलीस अंमलदार यांची मदत घेवून संयुक्तपणे छापा करवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे
शाखेकडील पथक व पुसेगांव पोलीस ठाणेकडील पथक यांनी संयुक्तपणे मिळाले बातमीचे ठिकाणी जावून छापा टाकून
कारवाई केली असता त्या ठिकाणी संशयीत इसम नामे सचिन बापू मदने वय 35 रा. रामोशीवाडी पोस्ट जाखणगांव ता. खटाव
जि. सातारा याने तो राहत असले त्याचे झोपडीचे लगत आडोशास अवैधपणे गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने एकुण 9
गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे निदर्शनास आले असून सदर ठिकाणी केले छापा कारवाई दरम्यान किंमत रुपये
2,78,900/- किंमतीची 11 किलो 156 ग्रॅम वजणाचा गांजाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई मध्ये श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस
अधीक्षक सातारा व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक अरूण देवकर, पुसेगांव पोलीस ठाण्याचे स. पो. नि. संदीप पोमण, स्थागुशा सातारा कडील पोउनि परितोष दातीर,
साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, हसन तडवी, अमृत
कर्पे, अमित सपकाळ, राजू कांबळे, गणेश कापरे, धिरज महाडीक पुसेगांव पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार चंद्रहार
खाडे, सुधाकर भोसले, योगेश बागल, विपूल भोसले, अमृता चव्हाण, तात्या ढोले, अशोक सरक, रेश्मा भोसले, दर्याबा नरळे
यांनी कारवाईत सहभाग घेतला असून सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा
सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments