Type Here to Get Search Results !

वाई पोलीस ठाणेहद्दीमधील अग्नीशशस्त्र तस्कर सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातुन २ वर्षासाठी तडीपार.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

वाई पोलीस ठाणेहद्दीमधील अग्नीशशस्त्र तस्कर सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातुन २ वर्षासाठी तडीपार.



 वाई पोलीस ठाणेहद्दीमधील अग्नीशशस्त्र तस्कर सराईत गुन्हेगार अविनाश मोहन पिसाळ यांस ०२ वर्षोंसाठी सातारा जिल्ह्यामधुन केले हद्दपार.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुक अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक

श्री. तुषार दोषी यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित रहावा म्हणुन वाई पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार

यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने वाई पोलीस ठाणे हद्दीमधील सराईत गुन्हेगार

अविनाश मोहन पिसाळ रा बावधन ता. वाई जि.सातारा याचेविरुध्द वाई पोलीस ठाणे येथे बेकायदेशीर

शस्त्र बाळगणे धमकावणे असे गंभीर स्वरुपाचे ०४ गुन्हे दाखल असल्याने त्याचा हद्दपार प्रस्ताव

मा. उपविभागीय दंडाधिकारी वाई जि सातारा यांस सादर करण्यात आला होता. मा. उपविभागीय

दंडाधिकारी वाई यांनी त्यांस प्राप्त अधिकारान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे ५६(१) (अ) (ब)

प्रमाणे सदर सराईत आरोपी नामे अविनाश मोहन पिसाळ यांस सातारा जिल्ह्यामधुन पुढील ०२ वर्षोकरीता

हद्दपार करण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक साो श्री. तुषार दोषी, मा. अपर पोलीस अधिक्षक साो श्रीमती

वैशाली कडुकर मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो वाई विभाग श्री सुनील साळुंखे यांचे

मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्री.जितेंद्र शहाणे, तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक

सुधीर वाळुंज पो.हवा ८९ अमित सपकाळ (स्थानिक गुन्हे शाखा) पो.कॉ १३०२ नितीन कदम यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments