सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस केले जेरबंद
निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कारवाई
अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस केले जेरबंद
(अग्निशस्त्र व ०२ जिवंत काडतुसे असा एकुण ७७,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत)
सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असल्याने आदर्श
आचारसंहिता सुरु असुन मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा,
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साो, सातारा शहर विभाग सातारा यांनी अवैध्य अग्निशस्त्र बाळगणारे
इसमांचा शोध घेवुन त्याचेवर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे दि.२४/११/२०२५ रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे सांना त्यांचे खास
गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जरंडेश्वर नाका ते वाढे फाटा सातारा जाणारे रोडवर
श्रीकृष्ण मेडीकल समोरील वडाच्या झाडाखाली एक इसम थांबलेला आहे. त्याचे जवळ पिस्टल सारखे
अग्निशस्त्र असुन त्यास ताब्यात घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने व मिळाले गोपनिय बातमीच्या
अनुषंगाने जरंडेश्वर नाका सातारा ते वाढे फाटा सातारा जाणारे रोडवर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील
पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना मिळाले बातमीच्या वर्णनाचा एक इसम वडाच्या
झाडाखाली थांबलेला दिसुन आला. तेव्हा तो पोलीसांना पाहुन पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला त्यावेळी
त्याला पकडुन ताब्यात घेवुन पळुन जाण्याचे कारण विचारले असता त्याने समाधान कारक उत्तरे दिले
नाहीत. म्हणुन सदर इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचे जवळ एक देशी बनावटीचे पिस्टल सारखे
अग्निशस्त्र व दोन जिवंत काडतुसे मिळुन आले. त्यावेळी त्याचे जवळ मिळुन आलेल्या पिस्टल बाबत
त्यांचेकडे पिस्टल जवळ बाळगणेचा परवाना आहे काय? याबाबत त्यास विचारले असता त्याने त्याचे जवळ
कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी
व अंमलदार यांनी सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचेवर शाहुपुरी पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा
दाखल केला आहे. सदरचा आरोपी हा पोलीस कोठडीत असुन पुढील तपास चालु आहे.
अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने निवडणुक आचारसंहिता कालावधीमध्ये गोपनिय
माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेवुन त्यास अटक करुन त्याचेकडुन ७५,०००/- रु. किंमतीचे अग्निशस्त्र
व २,०००/- रु.किंमतीचे ०२ जिवंत काडतुसे असा एकुण ७७,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला
आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली
कडुकर, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांचे
मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी श्री. कुमार ढेरे व पोलीस अंमलदार सुरेश
घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार,
स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, विशाल धुमाळ, रोहित बाजारे यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments