Type Here to Get Search Results !

फलटणच्या इतिहासातील सर्वात मोठी शिवसेनेची रॅली.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

फलटणच्या इतिहासातील सर्वात मोठी शिवसेनेची रॅली.




फलटण येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व कृष्णा -भिमा विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर व नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ फलटण शहरातुन भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते 

 फलटणच्या इतिहासात पहिल्यांदाच सेलिब्रिटी बॉलीवूड अभिनेता गोविंदा समवेत रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये अभिनेता गोविंदने दिल्या जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा. या रॅलीला फलटण शहरातून नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद व त्याचबरोबर लाडक्या बहिणींचा प्रचंड असा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला फलटण तालुक्यात प्रथमच प्रचंड मोठ्या प्रमाणात रॅली पाहायला मिळाली ही ही रॅली फलटण येथील श्रीराम मंदिर पासून गजानन चौक,मारवाड पेठ, शुक्रवार पेठ ते मलठण तसेच पाचबत्ती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गजानन चौकामध्ये रॅलीची सांगता करण्यात आली.




Post a Comment

0 Comments