सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
शिवसैनिकाला दम दिला तर खबरदार!”~ पालकमंत्री मा. ना. शंभूराजजी देसाई
फलटण नगरपालिकेची निवडणूक ही लोकशाही मार्गानेच पार पडली पाहिजे.प्रत्येकाला आपले काम करण्याचा अधिकार आहे, मात्र शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा ठाम इशारा त्यांनी दिला. फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे शिवसेना अघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मा.ॲड.श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
शिवसैनिक हा पळपुटा नसतो !
तो आव्हानांना सामोरा जाणारा योद्धा असतो.
“अंगावर आला तर दहा पावले पुढे जाऊन उत्तर द्या”
ही शिकवण आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे, असेही ते म्हणाले.
मा. ॲड. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील पूर्ण पॅनलला विजयी करा, असे आवाहन करताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की,
फलटणच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.
नगरोत्थान योजना, जिल्हा नियोजन समिती आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून फलटणमध्ये विकासाचा पाऊस पाडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब) व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी, तसेच प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे.
आदरणीय उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांची संपूर्ण ताकद फलटणच्या विकासासाठी आपल्या सोबत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले
यावेळी व्यासपीठावर
स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील,
माजी सभापती विधानपरिषद मा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराज साहेब),
गृहराज्यमंत्री मा. ना. योगेशभैया कदम,
कोकणचे आमदार मा. निलेश राणे, मा.सुभद्राराजे नाईक निंबाळकर , माजी आमदार दीपकराव चव्हाण सर,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,
मा.श्रीमंत. रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मा. श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर,
नगराध्यक्षपदाचे उमेदवार युवानेते मा. युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, मा.श्रीमंत
विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती सौ. रेश्माताई भोसले,
शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव,
तसेच शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments