सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/दादा जाधव
स्वराज व शरयू सह फलटण तालुक्यातील कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊस दर जाहीर करण्याबाबत इशारा.
गळीत हंगाम सुरु होऊन एक महिना होऊन गेला तरी आपले साखर कारखान्याने ऊसाचा प्रति टन पहिली उचल जाहीर केला नाही. तरी गळीत सुरु होण्याअगोदर ऊस दर जाहीर करणे बंधनकारक होते. परंतु आपल्या कारखान्यांने सातारा जिल्हयातील इतर साखर कारखान्याप्रमाणे प्रति टन ३५०० रुपये दर दयावा अन्यथा आपल्या साखर कारखान्यावर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काटा बंद आंदोलन करणेत येईल, हे आंदोलन टाळणेसाठी आपण येत्या तीन दिवसामध्ये ऊसाची पहिली उचल ३५०० रुपये जाहीर करावी व ऊस बील शेतकऱ्यांना अंदा करावे. मागणीची दखल न घेतलेस सातारा जिल्हयातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी काटा बंद आंदोलन करतील. याची सर्वस्वी जबाबदारी साखर कारखाना प्रशासन व फलटण तालुका प्रशासन यांची राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून फलटण तालुक्यातील साखर कारखान्यांना निवेदाद्वारे देण्यात आला आहे
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामुलकर,
फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव,
राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. रवींद्र घाडगे,पक्ष फलटण तालुकाध्यक्ष दादा जाधव,साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले,बंटी जाधव, विठ्ठल भोसले उपस्थित होते

Post a Comment
0 Comments