सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
कृषिदूतांनी केले दुधेबावी येथे बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदूत यांनी ग्रामीण जागृती कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प 2025-26 कार्यक्रमांतर्गत दुधेबावी ता.फलटण जि.सातारा येथे बीज प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक गावकऱ्यांना दिले.
यावेळी कृषिदूतांनी
बीजप्रक्रिया म्हणजे बियाण्यांना पेरणीपूर्वी रोग, किडी आणि बुरशींपासून संरक्षण देण्यासाठी विशिष्ट रसायने किंवा जैविक पदार्थ वापरून प्रक्रिया करणे याची सखोल माहिती शेतकय्रांना दिली तसेच बीजप्रक्रियेमुळे बियाण्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून उत्पादनात वाढ होते व पिकांची गुणवत्ता सुधारते हे सांगून बीजप्रक्रियेचे महत्व विशद केले.
तसेच बीजप्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या जैविक व रासायनिक प्रक्रिया साहित्याचा वापर, प्रमाण व योग्य पद्धतींचे प्रात्यक्षिकांद्वारे सविस्तर मार्गदर्शन कृषिदुतांकडून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा.एन.ए.पंडित,AIA प्रमुख प्रा. डॉ. जी.बी. अडसूळ आणि वनस्पती रोगविज्ञान विषय मार्गदर्शक प्रा. पी. व्ही भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.कृषिदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे ,ऋषिकेश ओंबासे,रोहित वाघमारे, प्रणव साळुंखे ,झहीर मणेरी, श्रीराम मोहिते, यांनी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.

Post a Comment
0 Comments