सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ हरिदास सावंत (सर)
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागास पारितोषिके प्राप्त.
सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागास पारितोषिके प्राप्त. फलटण येथे सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागास एकूण ४ पारितोषिके प्राप्त झाली.विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात इयत्ता आठवीतील कुमारी वैभवी भोसले या विद्यार्थिनीस द्वितीय तर मोठ्या गटात इयत्ता दहावीतील कुमारी दुर्वा कदम या विद्यार्थिनीस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रकारात प्राथमिक गटात विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ आशा यादव यांना तसेच प्रयोगशाळा परिचारक श्री जयंत काळोखे या दोघांनाही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असून त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. या सर्वांचे तसेच विज्ञान विभाग प्रमुख सौ ज्योती साळुंखे इत्यादींचे साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद रावजी साळुंखे पाटील , संस्था अध्यक्ष माननीय श्री धनंजय दादा साळुंखे पाटील , संस्था संचालक माननीय श्री राजेंद्र शेवाळे , माननीय श्री माणिक आप्पा भोसले , विश्वस्त समितीचे सदस्य माननीय श्री विक्रम आपटे , माननीय श्री राजेंद्र भोसले, संस्था सचिव तथा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ऊर्मिलाताई जगदाळे तसेच साखरवाडी विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे कार्यवाह श्री हरिदास सावंत सर आणि विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी व पालकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
0 Comments