सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
दुधेबावी येथे कृषीदूतांनी दिले स्वच्छ दूध उत्पादनावर प्रात्यक्षिक .
दुधेबावी, ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचालित कृषी महाविद्यालय, फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत.
शेतकर्यांसमवेत विविध विषयांवर प्रात्यक्षिक देत असताना शनिवार दि.13 डिसेंबर रोजी त्यांनी दुध उत्पादक शेतकय्रांना पारंपारिक पद्धतीमध्ये आधुनिक तंत्राची जोड देऊन् स्वच्छ् दुध् उत्पादनावर प्रात्यक्षिक दिले.
यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांबरोबर धारा काढताना घेतल्या जाणाऱ्या स्वच्छतेविषयी चर्चा केली.तसेच सध्याच्या दूध उत्पादन पद्धतीमध्ये अजून स्वछता राखाल्यानंतर होणारे फायदे पटवून देण्यात आले.कृषीदूतांद्वारे स्वच्छ दूध उत्पादन पद्धतीच्या क्रियांचे नमुने सुद्धा दाखवण्यात आले.
यावेळी दुध उत्पादक शेतकरी अमोल नाळे, ग्रामस्त आणि शेतकरी उपस्थित होते.
यासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या
प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर ,कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे , ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, प्रणव साळुंखे, झहीर मणेरी, श्रीराम मोहिते, यांनी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.

Post a Comment
0 Comments