Type Here to Get Search Results !

कृषिदूतांनी सांगितले ठिबक सिंचनाचे महत्त्व शेतकऱ्यांशी संवाद; फलटणच्या विद्यार्थ्याकडून मार्गदर्शन.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

कृषिदूतांनी सांगितले ठिबक सिंचनाचे महत्त्व शेतकऱ्यांशी संवाद; फलटणच्या विद्यार्थ्याकडून मार्गदर्शन.



फलटणच्या कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थांनी

(कृषिदूत) दुधेबावी (ता.फलटण) येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत प्रात्यक्षिकांद्वारे ठिबक सिंचन प्रणालीची माहिती दिली.


राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फलटण येथील कृषी महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी दुधेबावी येथे येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली त्यांनी विविध विषयांवर माहिती मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देत पारंपरिक पद्धतीला आधुनिक तंत्राची जोड देऊन ठिबक सिंचन प्रणालीवर प्रात्यक्षिके दिली. गावातील शेतकऱ्यांनीही ठिबक सिंचन प्रणालीचे महत्त्व सांगितले 


यावेळी शेतकरी अनिल चांगण यांनी त्यांच्या शेतातील ठिबक सिंचन प्रकल्पांतर्गत पाण्याचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केले त्याविषयी माहिती दिली. त्यातून होणारे फायदे ,अनुभव सांगितला. शेतकऱ्यांना शेताचे या प्रणालीचा उपयोग करण्याचा सल्ला कृषी दुतांनी दिला.या प्रणालीमुळे प्रामुख्याने पाण्याची बचत होते, खतांचा योग्य प्रमाणात वापर ,उत्पादन वाढ,खतांचा खर्च कमी होतो, पिका नुसार खत वाटप ,मनुष्यबळ कमी करते, मातीची सुपीकता वाढवते, आधी ठिबक सिंचन प्रणालीचे फायदे होते असल्याची माहिती कृषीदुतांनी शेतकऱ्यांना सांगितले 


यावेळी ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते .कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .यू .डी चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय प्राचार्य डॉ.एस.डी न निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा.एन.ए.पंडित, एआयए प्रमुख प्रा. डॉ. जी.बी. अडसूळ  यांचे मार्गदर्शन लाभले. कृषिदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे,ऋषिकेश ओंबासे,रोहित वाघमारे,प्रणव साळुंखे, झहिर मणेरी , श्रीराम मोहिते यांनी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले.

Post a Comment

0 Comments