सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
पाचगणी येथे ५,००,००० रुपये किमतीचे कोकेन सदृष्य अंमली पदार्थ हस्तगत.
(स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पाचगणी पोलीस ठाणे यांची कारवाई)
(मुंबई येथील पोलीस अभिलेखावरील आरोपी व त्याचे ९ साथीदार यांचेकडून ५,००,०००/- रुपये किमतीचा
कोकेन सदृष्य अंमली पदार्थ तसेच चारचाकी वाहने व मोबाईल हॅन्डसेट असा मिळून एकूण ४२,८५,०००/-
रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त )
श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा
यांनी सातारा जिल्हयामध्ये अंमली पदार्थ विक्री, निर्मिती, वाहतूक करणारे इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर
प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा सातारा व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना
दिलेल्या होत्या.
दि.१७/१२/२०२५ रोजी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना त्यांचे
विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पाचगणी येथील घाटजाई मंदिराजवळ संशयीत हा त्याचे
कब्ज्यात कोकेन हा अंमली पदार्थ बाळगले स्थितीत असुन तो सुमारे ३० ते ३५ वर्षाचा असुन त्याने अंगामध्ये
निळया रंगाचा पँट व पिवळसर रंगाचा टिशर्ट परिधान केलेला आहे अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यांनी
सदरची माहिती श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक
सातारा व श्री. सुनिल साळूंखे उपविभागीय पोलीस अधिकारी वार्ड विभाग वाई यांना कळविली. दरम्यान स्थानिक
गुन्हे शाखा सातारा येथील एक पथक पाचगणी परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असल्याने सहायक पोलीस निरीक्षक
दिलीप पवार यांनी नमुद पथकास अंमली पदार्थ कारवाई कामी मदतीस घेवून प्राप्त माहितीचे ठिकाणी
दि.१७/१२/२०२५ रोजीचे ००.०५ वा चे सुमारास छापा विस्टा ब्रॅन्ड सोसायटीमधील इस्टेला १ ए नावचे
बंगल्याचे समोर पार्किंग मध्ये एक पांढ-या रंगाची स्कोडा रॅपीड कार क्र. एम. एच. ०२ डी. एन. ०२५९ ही उभी होती
त्या गाडीमध्ये एकूण ५ इसम बसले होते. गाडीच्या ड्रायव्हर सिटवर बसलेला प्राप्त बातमीतील वर्णनाचा निळया
रंगाची पॅन्ट व पिवळसर रंगाचा टि शर्ट असलेला इसम दिसून आला तसेच त्याचे सोबत स्कोडा गाडीमध्ये ४
इसम व एम. जी. हेक्टर कार क्र एम. एच. ०१ डी. के. ८८०२ मध्ये ५ इसम असे एकूण १० इसम मिळून आले. नमुद
इसमांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जातमध्ये ५,००,००० /- रुपये किमतीचे कोकेन सदृष्य अंमली पदार्थ
तसेच दोन चारचाकी वाहने व मोबाईल हॅन्डसेट असा मिळून एकूण ४२,८५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल
मिळून आला. कोकेन सदृष्य अंमली पदार्थाबाबत ताब्यात घेतलेल्या इसमांकडे विचारपूस केली असता सदरचा
कोकेन सदृष्य अंमली पदार्थ पाचगणी शहरामध्ये विक्री करण्याकरीता आणला असल्याचे सांगीतल्याने त्यांचे
विरुध्द पाचगणी पोलीस ठाणे ३०५ / २०२५ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) अन्वये दाखल केला असून
नमुद गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा हे करीत आहेत.
श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा व
श्री. सुनिल साळूंखे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण
देवकर, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उप निरीक्षक परितोष दातीर, बालाजी सोनुने स्थानिक
गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले,
लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, विशाल पवार, पाचगणी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रविंद्र कदम, श्रीकांत
कांबळे, तानाजी शिंदे, उमेश लोखंडे, अमोल जगताप, गोकुळ बोरसे, सतिश पवार, विनोद पवार, ज्योती पोळ
यांनी सदरची कारवाई केली असून कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी पोलीस
अधीक्षक सातारा, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
आरोपींची नावे-
१) महंमद नावेद सलिम परमार वय ३२ वर्षे, रा. हाजी बिल्डींग, तिसरा मजला, रुम नं ३४, भेंडी बाजार,
मुंबई
२) सोहेल हशद खान वय ३५ वर्षे रा.२०२ दुसरा मजला रुम नं. १३ दिनाथ बिल्डींग पी. बी. मार्ग मुंबई
३) महंमद ओएस रिजवान अन्सारी वय ३२ वर्षे रा. ११८ गोल दरवाजा शुक्लाजी इस्टेट रुम नं.३ जवळ
बिलाल मज्जीद नागपाडा मुंबई
४) वासिल हमीद खान वय ३१ वर्षे रा. १८ ए अरबलेन बोरी चाळ पहिला मजला रुम नं.३३ नागपाडा
मुंबई
५) महंमद साहिल अन्सारी वय ३० वर्षे रा. ११०४ आकरावा मजला शिलाजी टॉवर मुंबई सेन्ट्रल
६) जिशान इरफान शेख वय ३१ रा. खांडीया इस्टेट मुन्सी बिल्डींग पहिला मजला भायखळा मुंबई
७) सैफ अली कुरेशी वय ३१ वर्षे रा. हाजी सुलेमान बिल्डींग दुसरा मजला रुम नं. २१ मज्जीद गल्ली मुंबई
८) महंमद उबेद सिध्दीकी वय २७ वर्षे रा. ३० / ३२ नवाब आयास ट्रस्ट बिल्डींग नं.२ रुम नं.२१६
भेंडीबजार मुंबई
९) अली अजगर सादिक राजकोटवाला वय ३० वर्षे रा. आशियाना अपार्टमेंट १० वा मजला रुम नं. १०३
दारुल मोहदा टॉवर जवळ नागपाडा मुंबई
१०) राहिद मुख्तार शेख वय ३१ रा. १८ अरबलेन बोरी बिल्डींग २ मजला रुम नं.४५ ग्रॅन्ट रोड मुंबई

Post a Comment
0 Comments