सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण वैभव जगताप
पाच ते सहा वर्षापासून फरारी असलेल्या आरोपीच्या लोणंद पोलिसांनी आवळल्या मुसक्या.
सन 2019 व 2023 पासुन फरारी असलेले दोन आरोपी व एक विधीसंघर्षीत बालक यांना अटक / ताबाघेण्यात लोणंद पोलीसांचे यश.
जिल्हयामधील फरारी आरोपींना तात्काळ अटक करणेबाबत मा. श्री तुषार दोषी, पोलीस अधीक्षक
सातारा, मा. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री विशाल कृष्णा खांबे उपविभागीय
पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना व आदेश दिले
होते. त्यानुसार लोणंद पोलीस स्टेशनमधील गुन्हयात फरारी असलेले आरोपींना तात्काळ अटक
करणेबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री सुशिल भोसले यांनी मोहीम राबवली.
लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 290/2023 भादवि. 420, 406, 34 मधील आरोपी नामे विकास
बबन जाधव वय 55 रा. शेंदुर्जने ता. वाई जि. सातारा याने गुन्हा केलेपासुन ते फरारी होता. सदरचा आरोपी हा त्याचे
राहते घरी आला असलेबाबत सपोनि श्री सुशिल भोसले यांना त्यांचे बातमीदार यांचे मार्फत माहीती मिळाली
असल्याने त्यांनी लोणंद पोलीस स्टेशनकडील डी. बी. पथकाचे मार्फत शेंदुर्जने ता. वाई येथून आरोपीस दिनांक
02/12/2025 रोजी ताब्यात घेतला आहे. सदर आरोपीस अटक करुन न्यायालयात भेटवल्यानंतर त्याची न्यायालयीन
अभिरक्षा मंजुर झालेली आहे.
लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 270/2023 भादवि. 454, 380, 34, गुन्हा रजि. नंबर 340/2023
भादवि 454, 380, 34, गुन्हा रजि. नंबर 81 / 2023 भादवि. 394, 395, 397, 457 या गुन्हयात विधीसंघर्षीत बालक
नामे अ.ब.क. (विधीसंघर्षीत बालकाचे नावाची गोपनियता पाळाण्याची असल्याने नाव अ. ब. क. ठेवण्यात
आले आहे.) याने घरफोडी, दरोडा असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेपासुन तो फरारी होता. दिनांक
०३/१२/२०२५ रोजी वि.सं. बालक हा भुरकरवाडी तरडगाव ता. फलटण जि. सातारा येथे आलेबाबत
माहीती सपोनि श्री सुशिल भोसले यांना प्राप्त झाली असल्याने त्यांनी डी. बी. पथक यांचे मार्फत सापळा रचुन
त्यास ताब्यात घेतले आहे. सदर बालकास गुरनं २७० / २०२३ भादवि. ४५४, ३८०, ३४ या गुन्हयात बाल
न्यायमंडळ, सातारा येथे हजर ठेवुन त्याची निरीक्षण गृहात रवानगी केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन 368/2019 भादवि. 363, 364, 346, 307, 194, 323, 324, 143, 147,
149, 504, 506, लोणंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 232/2025 भा. न्या. सं. 137 (2), 189 (2), 191(2),
118(2), 232, 111(1), 2 (ब), 4, अ. जा. ज. अत्या. प्रति. कायदा कलम 3( 1 ) (r), 3(2) (v), 3(2)(va), 6 मधील
फरारी आरोपी नामे विजय ऊर्फ काळया शशिकांत संकपाळ वय 20 रा. साखरवाडी शिक्षक कॉलनी ता. फलटण जि.
सातारा याने गुन्हा केलेपासुन तो फरारी होता. सदर आरोपी हा फलटण शहरात फिरत असलेबाबत गोपनिय
बातमीदार यांचे मार्फत सपोनि श्री सुशिल भोसले यांना माहीती मिळाल्याने त्यांनी डी. बी. पथक यांचे मार्फत सदर
आरोपीस ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई ही मा. श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा, मा. वैशाली कडुकर अपर पोलीस
अधीक्षक सातारा, मा. श्री विशाल कृष्णा खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग, मा. श्री सुशिल बी.
भोसले सहा. पोलीस निरीक्षक लोणंद पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, रोहीत हेगडे, सहा.
पोलीस फौजदार दिलीप येळे, पोलीस हवालदार राहुल वाघ, पोलीस नाईक बापुराव मदने, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल
नामदास, शेखर शिंगाडे, अमोल जाधव, अंकुश कोळेकर, विठ्ठल काळे, अवधुत धुमाळ, जयवंत यादव, संजय
चव्हाण, महीला पोलीस कॉन्स्टेबल मेघा ननावरे, स्नेहल कापसे यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.
सदर कारवाईबाबत वरिष्ठांनी हार्दिक अभिनंदन केले आहे....

Post a Comment
0 Comments