सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
श्रीमंत शिवाजी राजे आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2025-26 ची मुधोजी महाविद्यालयात जोरदार तयारी सुरू - मा. प्रा. डॉ. पी. एच. कदम
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयामध्ये श्रीमंत शिवाजी राजे नाईक निंबाळकर आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची तयारी करण्यात आलेली आहे. गेली अनेक वर्ष ही स्पर्धा या महाविद्यालयात घेतली जात आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध नामांकित महाविद्यालयातून वक्तृत्वाचा वारसा जोपासण्यासाठी अनेक युवक व युवती मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग नोंदवतात. यावर्षीही दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी ही स्पर्धा मुधोजी महाविद्यालयात संपन्न होणार आहे. आत्तापर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे अशा विविध जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन गुगल फॉर्म द्वारे रजिस्ट्रेशन करून आपली नोंदणी केली आहे. यावर्षीच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील यामध्ये आपला सहभाग नोंदवता येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेच्या पत्रकामध्ये नियमावली दिलेली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी.एच.कदम सर यांनी यावेळी माहिती देत असताना विद्यार्थ्यांची प्रभावी वक्तृत्व कला व्हावी. मुधोजी महाविद्यालयाने अनेक नामवंत वक्ते महाराष्ट्राला दिलेले आहेत. हाच दैदिप्यमान वारसा चालवण्यासाठी संस्थेचे सेक्रेटरी साहेब श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील युवक व युवतींनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे त्यांनी आवाहन केले. सहभाग नोंदवणाऱ्या महाविद्यालयीन तरुण व तरुणींनी आमच्या गुगल फॉर्मवर रजिस्ट्रेशन करावे,तसेच ब्राउचर मध्ये दिलेल्या नियमावलीप्रमाणे स्पर्धा या सुरळीत पार पडतील असेही त्यांनी सांगितले. तसेच लांबून येणाऱ्या स्पर्धकांनी महाविद्यालयाशी अगोदरच संपर्क करावा असेही त्यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments