Type Here to Get Search Results !

कृषिदुतांनी शेतकऱ्यांना गादीवाफ्या विषयी मार्गदर्शक केले.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

कृषिदुतांनी शेतकऱ्यांना गादीवाफ्या विषयी मार्गदर्शक केले.



   दुधेबावी ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न आणि फलटण एज्युकेशन सोसायटी  संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या अंतिम सत्रातील कृषिदुतांनी गादीवाफा  निर्मितीची पुर्ण  माहितीदिली. 


यावेळी कृषिदुतांनी सांगितले की , गादीवाफा म्हणजे शेतात तयार केलेले उंचवटे. या वाफ्यामुळे पिकांना पुरेशी हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो. तसेच पाण्याची चांगली व्यवस्था होते. पावसाळ्यात जेव्हा जास्त पाऊस येतो तेव्हा पाणी साठून न राहता त्याचा निचरा होतो ज्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही असे त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. यावर शेतकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले व उत्तम प्रतिक्रिया दिली.


या कार्यक्रमासाठी कृषी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, श्रीमंतशिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे,कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रमअधिकारी प्रा. एन. ए. पंडित, AIA प्रमुख डॉ. जी. बी.अडसूळ आणि प्रा. एस.एस.आडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, प्रणव साळुंखे, झहीर मनेरी, श्रीराम मोहिते. यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.

Post a Comment

0 Comments