Type Here to Get Search Results !

कृषी महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी सोनवडी खुर्द येथे टोमॅटो केचप तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

कृषी महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी सोनवडी खुर्द येथे टोमॅटो केचप तयार करण्याचे प्रात्यक्षिक दिले. 



 सोनवडी खुर्द,ता. फलटण येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६

 गावात भाजीपाला व फळांपासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादने या विषयावर विशेष प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यामध्ये टोमॅटो सॉस (केचप) तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.


टोमॅटो सॉस बनवण्याची पद्धत, लागणारी साधने, साहित्य, प्रक्रिया, पॅकिंग व शुद्धता राखण्याचे तंत्र याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षणामध्ये टोमॅटोची निवड, उकळवणे, मिक्स करणे, गाळणी प्रक्रिया, मसाले व संरक्षक वापर, आणि सॉस बाटलीत भरून ठेवण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी ग्रामस्थांना मिळाली.


  या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर,कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. ढालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित, प्रा. जी .बी.अडसूळ प्रा.आर.डी.नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत आदित्य कणसे, आदित्य साबळे, कुणाल काशिद, ऋतुराज पाटील, रोहित वाबळे, विश्वजीत साळुंखे, सोमनाथ ढोपे  यांनी यावेळी प्रात्यक्षिक करून दाखवले.

Post a Comment

0 Comments