Type Here to Get Search Results !

श्रीमंत शिवाजी राजे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मुधोजी महाविद्यालयाने वक्तृत्वाची परंपरा जपलेली आहे - प्राचार्य डॉ.पी.एच. कदम

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

श्रीमंत शिवाजी राजे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मुधोजी महाविद्यालयाने वक्तृत्वाची परंपरा जपलेली आहे - प्राचार्य डॉ.पी.एच. कदम.


 

 फलटण दि. 16 जानेवारी 2026 मुधोजी  महाविद्यालयांमध्ये आज श्रीमंत शिवाजी राजे करंडक  2025-26 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन झाले . या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर स्पर्धेचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते , तर उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी.एच.कदम सर हे होते, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. भोसले यु.एस., आय.क्यू. ए.सी. विभागाचे प्रमुख डॉ. टि.पी. शिंदे, महाविद्यालयाच्या राज्य स्पर्धा समितीचे चेअरमन प्रा. वेळेकर सर, समितीचे सर्व सदस्य, स्पर्धेचे स्पॉन्सर श्री.विराज नाईक निंबाळकर यांच्या वतीने उपस्थित असलेल्या प्रा.डॉ. सविता नाईक निंबाळकर, परीक्षक, वरिष्ठ,कनिष्ठ व आय.टी. विभागाचे सर्व प्राध्यापक महाराष्ट्राच्या विविध कॉलेजमधून आलेले स्पर्धक, प्रशासकीय स्टाफ, व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या समितीचे चेअरमन प्रा वेळेकर सर यांनी करून या स्पर्धेचा उद्देश, आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केला. यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार स्पर्धा समितीच्या वतीने घेण्यात आला. यानंतर स्पर्धेचे उद्घाटक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजी राजे यांच्या कार्याचा आढावा देत मुधोजी महाविद्यालयाने वक्तृत्वाची परंपरा जपलेली आहे. महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून स्पर्धक या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. ही वक्तृत्वाची परंपरा आपल्याला पुढे नेली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. यानंतर प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये संपूर्ण स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचा आढावा घेत अनेक नामवंत विद्यापीठातून आणि कॉलेजमधून आलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच मुधोजी महाविद्यालय व फलटण एज्युकेशन सोसायटीने अनेक नामवंत वक्ते महाराष्ट्राला दिलेले आहेत. व आपल्या वक्तृत्वातून समाज घडवण्याचे कार्य केले आहे. मुधोजी महाविद्यालयाची ओळख महाराष्ट्रामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वातून निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणि हीच वक्तृत्वाची परंपरा मुधोजी  महाविद्यालयाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून जपली आहे. श्रीमंत शिवाजी राजे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना पर्वणीच असल्याचे मत त्यांनी स्पष्ट केले. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा. संग्राम निंबाळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.देशमुख एन.डी. यांनी केले. आणि हा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला.

Post a Comment

0 Comments