सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या फलटणच्या भूमीत विजयश्री खेचून आणण्याची ताकद -श्री. लक्ष्मणराव नाईक निंबाळकर
फलटण, दि. 16 जानेवारी 2026. छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या फलटणच्या मातीला नमन करून स्पर्धेत उतरा तुम्ही विजयश्री खेचून आणणारच.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मणराव नाईक निंबाळकर यांनी मुधोजी महाविद्यालयामध्ये झालेल्या श्रीमंत शिवाजी राजे करंडक- 2026 च्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये बक्षीस व पारितोषिक वितरण समारोहाच्या कार्यक्रमांमध्ये स्पर्धकांना प्रेरणा देताना आपले मत स्पष्ट केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी उत्कृष्ट वक्तृत्वाचा ठसा या स्पर्धेमध्ये उमटविला. स्पर्धेमध्ये हार आणि जीत होतच राहते. पण परिस्थितीला न घाबरता आपण या स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. असे आवाहन यावेळी श्री लक्ष्मणराव यांनी केले. या स्पर्धेचा बक्षीस व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पार पडला. यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. कदम उपस्थित होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत "अ" गटातून शरद चंद्र पवार महाविद्यालय सोमेश्वर या कॉलेजची विद्यार्थिनी कु.प्रीती कुंडलिक ठोंबरे हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तर रमेश सुनील कचरे, अभय कृष्णकांत आळशी, यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले, मुधोजी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पायल बिभीषण जाधव स्वतंत्र गट ब चे पारितोषिक मिळाले. कनिष्ठ महाविद्यालयीन गटातून चि.यशराज हेगडे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला, तर कु. भक्ती होवाळ, कु. वैभवी तावरे या विद्यार्थिनीने द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये परीक्षकांना नंबर देणे देखील कठीण झाले होते.अशा वक्तृत्व स्पर्धा मुधोजी महाविद्यालयात पार पडल्या. स्पर्धकांनी अतिशय प्रभावी वक्तृत्वातून मांडलेले विषय, त्यासाठी समर्पक असणारी विविध उदाहरणे व दाखले वाखाणण्याजोगे होते. स्वर व शब्दांची लयबद्धता, आवाजातील चढ उतार, यामुळे प्रेक्षकांची मने भारावून गेली. स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्यांना सर्टिफिकेट दिले. स्पर्धकांना पारितोषिक वितरण केल्यानंतर आपल्या अध्यक्षनीय भाषणात प्राचार्य कदम सर यांनी वक्तृत्व स्पर्धेचे मनापासून कौतुक केले. व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी देखील फोनवरून स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा सौ. नीलम देशमुख यांनी केले. प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.वेळेकर सर यांनी करून दिला.आभार प्रदर्शन ज्येष्ठ प्राध्यापक टिके सर यांनी केले. कार्यक्रमासाठी आय. क्यू.ए.सी. चे कॉर्डिनेटर डॉ. टी. पी. शिंदे, मराठी विभागाचे डॉ. ए. एन.शिंदे सर, महाविद्यालयाचे श्रीमंत शिवाजी राजे करंडक 2026 च्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या समितीचे सर्व प्राध्यापक, स्पर्धेसाठी आलेले मान्यवर परीक्षक, प्रा. श्री.भिमराव तोरणे, प्रा. डॉ,कोकीळा चांगन, प्रा.डॉ.सीता जगताप,. प्रा.आशालता काशीद, प्रा.दिलीप शिंदे, स्पर्धेचे स्पॉन्सर श्री. विराज लालासाहेब नाईक निंबाळकर. महाविद्यालयाचा वरिष्ठ -कनिष्ठ प्राध्यापक वृंद, आयटी विभाग, स्पर्धक, स्पर्धकांसोबत आलेला पालक वर्ग, प्रशासकीय कर्मचारी, सेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments