सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
जि.प.प्राथमिक शाळा तडवळे येथे बाल बाजार व महीला पालकांचा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम उत्साहात.
तडवळे जि प प्राथमिक शाळेच्या बाल बाजारात पंधरा हजार रुपयांची आर्थिक उलाढाल...
विद्यार्थ्यांनी घेतला व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव...
हळदी-कुंकू कार्यक्रमही उत्साहात साजरा पार पडला...
तडवळे ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आज शनिवार दिनांक १७/०१/२०२६ रोजी बाल बाजार व माता पालकांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालबाजारात शाळेतील १०४ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आनंद घेतला. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढावे तसेच विद्यार्थ्यांनी बाजारात भाजीपाला विकताना काय करावे लागते याचा अनुभव यातून मिळाला.या उपक्रमातून जवळजवळ १५००० रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. तसेच महिला पालकांची हळदी-कुंकू कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली व मुलांचा भाजीपला खरेदी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.
या कार्यक्रमास साठी गावातील बहुसंख्य पालक, ग्रामस्थ व महिलांनी उपस्थित राहून भरभरून असा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री चांदगुडे सर, जगताप मॅडम, शिंदे मॅडम, बांडे सर ,मोरे मॅडम व औटे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले होते. सर्व ग्रामस्थांनी बालबाजार या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

Post a Comment
0 Comments