सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
भिलकटी येथे मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या "विशेष श्रमसंस्कार शिबिराची" उत्साहात सुरुवात.
फलटण- दि. 29 डिसेंबर 2025 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उपसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग व मुधोजी महाविद्यालय फलटण. यांच्या संयुक्त विद्यमाने याही वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे भिलकटी येथे करण्यात आले., " जलसंधारण व्यवस्थापन व पडीक क्षेत्र विकासासह शाश्वत विकासातील युवकांचे योगदान " हे ब्रीदवाक्य घेऊन या एन एस एस च्या सात दिवसीय कॅम्प चे उद्घाटन मोठ्या दिमाखात झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, मा.अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद, कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मा. श्री अरविंद निकम.प्रशासन अधिकारी- फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ. पी.एच. कदम. प्राचार्य- मुधोजी महाविद्यालय फलटण. रजिस्टार प्रा श्री.गायकवाड , ,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.फिरोज शेख, प्रा. प्रशांत शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.शंभूराजे नाईक निंबाळकर, साहा.कार्यक्रम अधिकारी सौ शारदा जाधव. भिलकटी गावचे सरपंच श्री प्रकाश गोडसे. उपसरपंच निलेश गोरे. ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, फडतरवाडी विकास सोसायटीचे चेअरमन, ग्रामस्थ,या शिबिर स्थळी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रम अधिकारी प्रशांत शेटे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व संपूर्ण रूपरेखा व माहिती सांगितली.कॅम्पचा उद्देश स्पष्ट केला यानंतर शस्त्र पूजन व प्रतिमा पूजन केल्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संत गाडगेबाबा, व श्रीमंत मालोजीराजे यांच्या प्रतिमा पूजनानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर आपल्या अभिभाषणात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कॅम्प यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये प्रशासन अधिकारी श्री निकम सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व व त्यातील वैज्ञानिक संदेश व सांस्कृतिक भावना याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉक्टर पीएच कदम सर यांनी भूषवत असताना. राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेम, निसर्गाबद्दल असणारा मानवतावादी दृष्टिकोन, शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान, जलसंधारणाची आवश्यकता, इत्यादी बद्दल स्वयंसेवकांना योग्य मार्गदर्शन केले. यानंतर भिलकटी गावचे सरपंच श्री प्रकाश गोडसे यांनी देखील भिलकटी गावाकडून स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य, व मदत करण्याची भावना दर्शवली यानंतर प्रचंड टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाची अतिशय उत्साहाने सुरुवात झाली. या सात दिवशीय शिबिरामध्ये योगा,प्राणायाम कार्डिओ एक्झरसाइज, प्रभात फेरी, स्वच्छता, विविध विषयावर व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन कार्यक्रम यांचे सादरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे भिलकटी गावचे ग्रामस्थ व पदाधिकारी भारावून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक नाईक निंबाळकर शंभूराजे यांनी सर्वांचे आभार मानून उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला फलटण एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी मान्यवर महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक भिलकटी गावचे ग्रामस्थ राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments