Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहभागातून ग्रामविकासास युवकांचे प्राधान्य....

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहभागातून ग्रामविकासास  युवकांचे प्राधान्य....





प्राचार्य आर.के.गायकवाड : सुशिला शंकरराव गाढवे महाविदयालय खंडाळा व राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा यांच्या वतीने श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.........


सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा व राजेंद्र उच्च माध्यमिक विद्यालय खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार निवासी शिबिर दि 23/12/2025 ते दि 29/12/2025 अखेर मौजे झगलवाडी, ता खंडाळा याठिकाणी संपन्न झाले...

 सदर शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पंचक्रोशी विद्यालय जवळे लोहोम फाटा येथील सन्माननीय प्राचार्य आर. के .गायकवाड  व या कार्यक्रमाचे अध्यक्ष  सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय खंडाळा सन्माननीय प्राचार्य  हनुमंत जाधव सर, उपप्राचार्य सौ. पाटणे मॅडम उपस्थित होत्या .त्याप्रमाणे मौजे झगलवाडी गावचे उपसरपंच सन्माननीय गिरीश लिमण ,मा उपसरपंच सन्माननीय  महादेव लिमण, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र लिमण, सुनिल उंबरकर, संतोष पंडित, तानाजी शिंदे महाराज, संतोष लिमण, आदिनाथ मांढरे महाराज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. रत्नराज ढमाळ व सौ संगीता ढमाळ मॅडम, ग्रामस्थ व माता भगिनी उपस्थित होत्या....

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे सन्माननीय प्राचार्य आर के गायकवाड यांनी शिबीर संपन्न करणाऱ्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण भविष्यात जीवन जगताना या शिबीरातुन प्राप्त केलेल्या जाणीवा आपणास कायम सत्कर्मासाठी प्रेरीत करत राहतील.जीवन जगताना कायम  कधीही जाणीवांची उणीव ठेवू नका. आपण जी या गावात प्रेमाची आपुलकीची जिव्हाळाची पेरणी केली आहे ती अखंडपणे जपा.  या बाबत विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. समारोपप्रसंगी

राष्ट्रीय सेवा योजनचे  कार्यक्रमाधिकारी प्रा.जयप्रकाश गेजगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रियांका साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमात प्रसंगी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून संदेश खताळ,कु.समिक्षा भोसले,अजय पवार यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी

महाविद्यालयाच्या प्राध्यापिका रोहिणी मोरे मॅडम, प्राध्यापिका अशाली फडतरे ,कार्यक्रम अधिकारी प्रा.  प्रदिप मेंढापूरे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी  श्री. अक्षय वाघापुरे, विद्यार्थी विद्यार्थिनी,व झगलवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments