Type Here to Get Search Results !

मुधोजी महाविद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहाने साजरा.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

मुधोजी महाविद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहाने साजरा.


 


 फलटण दि.१० दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचा सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाने यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची सुरुवात माननीय प्राचार्य डॉ. पी.एच. कदम सर, उपप्राचार्य सौ. भोसले यु.एस, कलाविष्कार विभागाचे प्रमुख प्रा.वेळेकर सर, रसायन विभागाचे प्रा. आचार्य सर, ज्येष्ठ प्राध्यापक ए.एन.शिंदे,स्वरूपा अकॅडमीच्या सौ. भिसे  मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ देशमुख एन.  डी. यांनी करताना सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा वेळेकर सर यांनी उच्च माध्यमिक शाळांमध्येच विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची बीजे पेरली जातात. असे स्पष्ट केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.भोसले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच माननीय प्राचार्य डॉ.पी एच. कदम सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये  कनिष्ठ महाविद्यालयीन जीवनामध्ये युवकांचा उत्साह व जिद्द सकारात्मक गोष्टींसाठी वापरली गेली. तर युवकांचा सर्वांगीण विकास होऊन ते स्वतःच्या पायावर उभा राहू शकतील. सांस्कृतिक महोत्सवामध्ये आपल्या ग्रामीण परंपरा, नाटके,लोकगीते, पारंपारिक नृत्य, भारुडे, इत्यादींची जपणूक झाली पाहिजे. तरच सांस्कृतिक महोत्सव साजरा केल्याचे चीज होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

 या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी पोवाडे, नाटके, वाद्यवृंद अविष्कार, नृत्य, रिमिक्स डान्स, मराठी, हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य सादर करून अतिशय जोश पूर्ण वातावरणात, हा महोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्री .निंबाळकर एस. पी, तर कार्यक्रमाचे अँकरिंग प्रा.श्री. शिंदे डी.एल. यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक  एन.सी.सी, एन.एस.एस विभागाचे सर्व प्रमुख, वरिष्ठ व कनिष्ठ क्रीडा विभागाचे क्रीडा प्रमुख, प्रशासकीय कर्मचारी वर्ग, सेवक, व मुधोजी महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थी प्रचंड संख्येने उपस्थित होते. अतिशय शांतता व शिस्तबद्ध पद्धतीने हा कनिष्ठ महाविद्यालयाचा सांस्कृतिक  महोत्सव संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments