Type Here to Get Search Results !

पाली गावामध्ये गव्हाच्या पिकात गांजाची शेती करणारा पोलिसांच्या ताब्यात.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

पाली गावामध्ये गव्हाच्या पिकात गांजाची शेती करणारा पोलिसांच्या ताब्यात.



गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात सातारा तालुका पोलीसांची धडक

कारवाई तब्ब्ल 51 किलो असा व्यापारी प्रमाणातील गांजा जप्त.

(सातारा तालुका पोलीस ठाणेची धडाकेबाज कामगिरी)

सातारा तालुका पोलीस ठाणे कडील स.फौ धनाजी वायदंडे यांना गोपनिय माहिती मिळाली होती की पाली ता. जि. सातारा

गावच्या हददीत बेकायदेशीर रित्या गांजाची लागण केलेली आहे त्यानुसार पथक तयार करुन रेड कारवाई करणेत आली आहे.

सदर माहितीच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा,

श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली सातारा

तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी फॉरेन्सिक टिम, शासकीय पंच तसेच वजनकाटा मापकधारक

यांच्यासह सातारा तालुका पोलीस ठाणे कडील विशेष पथक तयार करुन पोलीस निरीक्षक, निलेश तांबे यांनी पथकासह मौजे

पाली ता.जि.सातारा या ठिकाणी रेड कारवाई केली असता सदर गावातील गट नंबर 23 मधील सुमारे 30 गुंठे क्षेत्र असलेल्या

गव्हाच्या पिकात अंतरपिक म्हणुन गांजा या पिकाची लागवड केल्याचे आढळले. सदर कारवाई दरम्यान सदर गांजा पिकाची

पडताळणी करुन सुमारे 51 किलो 275 ग्रॅम वजनाचा गांजा सुमारे 12 लाख 81 हजार 275 रुपये इतक्या किंमतीचा गांजा जप्त करणेत आला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायदयानुसार गुन्हा दाखल करणेत

आला असुन सदर गांजा लागवड करणारा एक आरोपी  नामदेव लक्ष्मण माने वय-42 वर्षे रा  पाली . ता .जि .सातारा यास अटक करणेत आलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि

सुदर्शन काटकर हे करित आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती

वैशाली कडुकर, मा.उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी

अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि विनोद नेवसे, सपोनि सुदर्शन काटकर,

सफौ धनाजी वायदंडे, पोहवा मनोज गायकवाड, पोहवा राजु शिखरे, पोहवा पंकज ढाणे, पोहवा दादा स्वामी, पोहवा

सतिश बाबर, पोहवा प्रदीप मोहिते, पोहवा मालोजी चव्हाण, पोहवा किरण जगताप, पोकॉ संदिप पांडव, पोकॉ सुनिल

भोसले, पोकॉ सचिन झनकर तसेच फॉरेन्सिक पथकातील सपोनि रुपाली मोरे, पोहवा मोहन नाचण, पोहवा प्रशांत ताटे,

पोहवा मारुती अडागळे, पोकॉ अमोल निकम यांनी केलेली आहे.

सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस

अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले

आहे

Post a Comment

0 Comments