Type Here to Get Search Results !

सुरवडी पंचायत समिती गणामध्ये कही खुशी..! कही गम..!

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

सुरवडी पंचायत समिती गणामध्ये कही खुशी..! कही गम..!




सुरवडी पंचायत समितीच्या अटीतटीच्या लढतीत नवीनच रणसंग्राम उभा, भाजपचे उमेदवार धनंजय साळुंखे यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार किरण साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपचे फलटण तालुका अध्यक्ष अमित रणवरे या़ंची उमेदवारी पक्षश्रेष्ठींनी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामुळे एका निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलले गेल्यामुळे भाजपच्या विरोधात नाराजीचा सूर दिसुन येत आहे.

अमित रणवरे हे लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलले गेले ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.आजही रणवरे हे लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या घराण्याशी निष्ठावंत आहेत परंतु अशा निष्ठावंत कार्यकर्त्याने बंड केल्या मुळे याचा फायदा नक्की कोणाला..?

पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर ते ऐकणार की त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार हे लवकरच स्पष्ट होईल.आज काल निष्ठा या शब्दाला किंमत राहीलेली नाही हे दिसु लागले आहे.मग या निष्ठावंतांनी आयुष्यभर नेत्यांच्या फक्त सतरंज्याच उचलायचा का..?

पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी गणांमध्ये व गटामध्ये जे खरे उमेदवारीचे दावेदार होते त्यांना डावलून चुकीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली गेली आहे असे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments