Type Here to Get Search Results !

ग. वि . भोसले प्रतिष्ठान , साखरवाडी आयोजित शालेय मुलांच्या सामान्यज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

सह्याद्री निर्भिड न्यूज 

साखरवाडी/ हरिदास सावंत (सर) 

ग. वि . भोसले प्रतिष्ठान , साखरवाडी आयोजित शालेय मुलांच्या सामान्यज्ञान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.



साखरवाडी  ता.फलटण जि. सातारा येथील श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शालेय मुलांच्या सामान्यज्ञान स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.साखरवाडी सह खराडेवाडी  , काळज , सुरवडी , फडतरवाडी , जिंती, होळ मुरूम , रावडी इत्यादी माध्यमिक विद्यालयांमधील इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या सुमारे ७५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग मिळाला. प्रतिष्ठानचे सदस्य श्री अमोल गणपतराव भोसले यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेसाठी अनुक्रमे रुपये ३०००/- रुपये २०००/- आणि रुपये १०००/- अशी रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार असून त्यासोबत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.याशिवाय आज स्पर्धेवेळी सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभागाचे प्रमाणपत्र आणि उत्तम प्रकारचे पेन व खाऊ पॅकेट देवून गौरविण्यात आले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सचिन गणपतराव भोसले , उपाध्यक्ष श्री संजय गणपतराव भोसले , सचिव श्री हरिदास दिगंबर सावंत सर , सदस्य श्री अमोल गणपतराव भोसले तसेच श्री माणिकआप्पा भोसले , कांताराम भोसले , विजय जगताप , समीर भोसले , संभाजीराजे जाधव , सूरज गाडे , राजेंद्र देशपांडे , मनोहर कणसे , इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन सचिव श्री हरिदास सावंत सर यांनी केले. भविष्यात असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून ग.वि . भोसले प्रतिष्ठानचा लौकिक सर्वदूर पोहोचवण्याचा संकल्प यावेळी श्री सचिन भोसले , संजय भोसले , हरिदास सावंत आणि अमोल भोसले यांचेसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



Post a Comment

0 Comments