सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
भाजपला दे धक्का...! आरडगावमधील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमधुन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश.
हिंगणगाव जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ.सारीका धैर्यशील उर्फ दत्ताबापु अनपट यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये धैर्यशील उर्फ दत्ताबापु अनपट यांची कार्यसम्राट म्हणून अनोखी ओळख आहे याच त्यांच्या कार्याचा ठसा उमठवणारा एक कार्यकाळ आजही गाजत आहे.
श्रीमंत रामराजे यांनी या दुष्काळी भागाला दिलेली जलसंजीवणी येथील जनता विसरु शकत नाही अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांच्यातुन येत आहे. प्रत्येक अडचणीच्या काळात अहोरात्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व कार्यसम्राट दत्ताबापू यांची मोलाची साथ लाभली आहे असे बोलले जात आहे.
जलनायक श्रीमंत रामराजे व कार्यसम्राट दत्ता बापू हे एक समीकरण जुळले आहे आम्ही ह्यांना विसरू शकत नाही.आणि याच पार्श्वभूमीवर आरडगाव येथील मुकुंद ज्ञानोबा भोईटे, प्रभाकर भुजंग भोईटे, संदेश हनुमंत भोईटे सुदाम नानासो भोईटे अशोक जगन्नाथ भोईटे अनिल नामदेव भोईटे, विलास सर्जेराव भोईटे, शिवाजी सर्जेराव भोईटे, महादेव गुलाबराव भोईटे, मनोज तानाजी भोईटे, अनिल विनायक भोईटे, रितेश अनिल भोईटे, हनुमंत विनायक भोईटे, विकास परबत भोईटे,प्रभाकर भुजंग भोईटे, चिमणराव हनुमंतराव भोईटे,सुदाम नानासो भोईटे, प्रकाश परबतराव भोईटे, सचिन अनिल भोईटे, रितेश अनिल भोईटे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (राजेगटात) प्रवेश केला.


Post a Comment
0 Comments