सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
घरगुती व्यवसायातुन आर्थिक उत्पन्न वाढीसाठी दुधेबावी मधील महिलांना मिळाले पनीर निर्मितीचे धडे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न आणि फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी दुधेबावी ता. फलटण येथे महिलांसाठी उपयुक्त असा उपक्रम राबविला. ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प 2025-26 अंतर्गत कृषीदूतांनी गावातील महिलांना दुधापासून व्यवसायिक दर्जाचे पनीर बनवण्याचे प्रशिक्षण दिले.
दुधाचे मूल्यवर्धन करून त्यापासून विविध पदार्थ बनवल्यास अधिक नफा मिळू शकतो ही बाब कृषी दुतानी महिलांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रशिक्षणात त्यांनी पनीर बनवण्याची शास्त्रशुद्ध पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखवली. तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेत पनीर जास्त काळ कसे टिकवुन ठेवता येते आणि त्याचे आरोग्यासाठी चे फायदे काय आहेत याचे महत्त्वही पटवून दिले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार झालेले पनीर आणि सोपी पद्धत पाहून उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले .
अशा घरगुती व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढू शकते हा विश्वास महिलांमध्ये निर्माण झाला. या उपक्रमाला गावातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला.या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, श्रीमंतशिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे,कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रमअधिकारी प्रा. एन. ए. पंडित, AIA प्रमुख डॉ. जी. बी.अडसूळ, विषय विशेषज्ञ प्रा.आर.डी.नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, प्रणव साळुंखे, झहीर मनेरी, श्रीराम मोहिते. यांनी हा कार्यक्रम आयोजित केला.

Post a Comment
0 Comments