Type Here to Get Search Results !

श्रीमंत रामराजे यांनी सुनेत्रा पवार व कुटुंबियांचे केले सांत्वन.. कै.अजित पवारांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली..

सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

श्रीमंत रामराजे यांनी सुनेत्रा पवार व कुटुंबियांचे केले सांत्वन..

कै.अजित पवारांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली..



 फलटणचे नाईक निंबाळकर राजघराणे आपल्या दुःखात सहभागी असून कै.अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रासह आपल्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर ओढवला आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी व अजित दादांना सद्गती प्राप्त होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करत काल बारामती येथे अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, यांनी सुनेत्राताई पवार यांची सांत्वन भेट घेतली यावेळी श्रीमंत रामराजे व रघुनाथराजे यांनी कै.अजित पवारांना आदरांजली वाहिली. दरम्यान श्रीमंत रामराजे यांनी बारामती येथे शरदचंद्र पवार यांच्या गोविंद बाग निवासस्थानी जाऊन त्यांची ही सांत्वन पर भेट घेतली.

Post a Comment

0 Comments