सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
उद्योगमंत्री मी आणि काही लोकं एम आय डी सी करत सुटले आहेत-उद्योगमंत्री उदय सामंत
फलटण येथील औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी या निवडणुका नंतर आपण स्वतः येथे येऊन २७७ हेक्टर मधील उर्वरित क्षेत्राच्या आरक्षणाबाबत आ. श्रीमंत रामराजे यांना सोबत घेऊन संबंधीत शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दर देऊन औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्याचे स्पष्ट संकेत देत आगामी काळात या विस्तारित औद्योगिक वसाहतीत आणखी उद्योग आणून येथील तरुणांना उद्योग व नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याची तसेच ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी हिताला प्राधान्य देऊन करण्याचे सुतोवाच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले.
खोटं बोला पण रेटून बोला, आणि जनतेला फसवा अफवा पसरवा हा काही लोकांचा उद्योग असला तरी त्यात तथ्य नाही डाओस येथील व्यस्त कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांनी कोणालाही फोन केला नाही, आणि केला असता तर उद्योग मंत्री म्हणून आपल्याशी चर्चा करुनच केला असता मात्र असा फोन झाला नसल्याची ग्वाही देत. कोणीतरी येथे मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि त्यांनी साताऱ्यासाठी एक मोठा उद्योग घेऊन येत असल्याचे सांगितल्याचे सांगण्यात आले मात्र त्यात तथ्य नसल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सभेत स्पष्ट केले.
निवडणुका संपताच आपण स्वतः येथे येऊन आ. श्रीमंत रामराजे यांच्या सोबत घेऊन २७७ हेक्टर क्षेत्रातील उर्वरित क्षेत्राच्या औद्योगिक वसाहतीमध्ये समावेशाबाबत संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना हवा तो दर देऊन औद्योगिक वसाहतीचा विस्तार करून तेथे कमिन्स नंतर आता छोटे उद्योग आणून येथील तरुणांना उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना. उदय सामंत यांनी दिली आहे.
लोकसभा, विधानसभा, नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीत या राज्यातील मतदारांनी शिवसेनेला दिलेला भरघोस पाठिंबा आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही कायम असल्याने आगामी काळात अनेक जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर भगवा फडकणार असल्याचे सांगताना फलटण तालुक्यात या सभेसाठी भर उन्हात केवळ आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरील प्रेमा खातर एवढा मोठा जनसमुदाय ज्यामध्ये वृद्ध, महिला, तरुण वर्ग यांचा प्रचंड सहभाग आहे. एकही माणूस इकडे तिकडे हलला नाही, निष्ठेने सभेसाठी उपस्थित आहेत याचाच अर्थ फलटण तालुक्यात शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून फलटण पंचायत समितीवर भगवा फडकणार असल्याने आगामी काळात या तालुक्यातील विकास प्रक्रिया, ग्रामीण भागातील रस्ते, शेतीच्या विकासासाठी विविध योजना, ग्रामीण भागातील विविध समस्या आणि औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराची जबाबदारी आम्ही स्वीकारली असून ती निश्चितपणाने पूर्णत्वास नेऊ याची ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात दिली.

Post a Comment
0 Comments